नाशिक : कळवण तालुक्यातील गणोरे येथील महिलेचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला़ याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पना पोपट चौधरी (वय ३५, मुग़णोरे, ताक़ळवण) या विवाहितेने रविवारी (दि़१२) एक वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले़ पती पोपट तुळशीराम चौधरी यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना दुपारी चार वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ़ राहुल पाटील यांनी घोषित केले़ या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू
By admin | Updated: April 13, 2015 00:58 IST