नाशिक : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि़ २) दुपारच्या सुमारास बोधलेनगर सिग्नलवर घडली़ मयत युवकाचे नाव महेश ऊर्फ शंकर छबू शिरसाठ (३०, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) असे आहे. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या शिरसाठ यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़; मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले़ या अपघाताची उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, बोधलेनगर सिग्नलवर मोठ्या संख्येने अपघात होत असून, याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
By admin | Updated: December 2, 2015 23:59 IST