शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

आठवड्यात दोन महिलांचा मृत्यू : नागरिकांनीच उभारले जेहान सर्कलवर ‘सिग्नल’

By admin | Updated: March 26, 2017 22:32 IST

गत आठवड्यात पाल्यांना परीक्षेहून घरी घेऊन जाणाऱ्या दोन दुचाकीधारक महिलांना भरधाव कारने धडक दिली व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यामुळे जेहान सर्कलवर त्वरित सिग्नल यंत्रणा बसवावी

नाशिक : शहरात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली असून, गंगापूररोडवरील जेहान सर्कल हा हॉट स्पॉट बनला आहे़ गत आठवड्यात पाल्यांना परीक्षेहून घरी घेऊन जाणाऱ्या दोन दुचाकीधारक महिलांना भरधाव कारने धडक दिली व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यामुळे जेहान सर्कलवर त्वरित सिग्नल यंत्रणा बसवावी तसेच महिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लेवा सखी मंचच्या महिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नागरिकांनी रविवारी (दि़२६) सायंकाळी एकत्र येत प्रतिकात्मक सिग्नल तयार करून तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून अभिनव आंदोलन केले़गंगापूररोडवरील जेहान सर्कल, शहीद चौक, सप्तरंग हॉटेल या ठिकाणी मोठ्या संख्येने अपघात होतात़ या अपघातांना आळा घालण्यासाठी याठिकाणी सिग्नल बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़ गत आठवडाभरात नीलिमा चौधरी व प्रा़ रूपाली पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला़ यामुळे परिसरातील महिला व नागरिकांनी रविवारी सायंकाळी जेहान सर्कलवर एकत्र आले़ यातील महिलांच्या हातामध्ये वाहतूक नियमांचे पालन करा, वेगमर्यादा पाळा या जनजागृतीपर घोषणांसह मृत्यूमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली वाहण्यात आली़