त्र्यंबकेश्वर : बेझे शिवारातील लव्हाळीपाडा येथे किकवी नदीत एका वृद्ध व्यक्तीचा (अंदाजे वय ६० ) मृतदेह आढळला आहे. अंधारवाडी शिवारातील भिका पारधी यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. अद्याप मृताची ओळख स्पष्ट झालेली नाही. मृतदेहाच्या अवस्थेवरून हा वृद्ध दोन ते तीन दिवसांपूर्वीच पाण्यात पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेला मृतदेह नशिक येथे शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस निरीक्षक अनील बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिलीप वाजे व काँस्टेबल कोरडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (वार्ताहर)
त्रंबकला वृद्धाचा पाण्यात पडून मृत्यू
By admin | Updated: August 1, 2015 00:26 IST