शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:16 IST

नाशिक : रविवारी सुटीनिमित्त मित्रांसमवेत दुचाकीवर फिरण्यासाठी गेलेल्या दिंडोरी रोडवरील वाढणे कॉलनीतील बावीस वर्षीय युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२४) दुपारी ढकांबे शिवारात घडली़ शुभम कैलास शिंदे (२२, रा़ गजपंथ विहार, म्हसरूळ) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव असून, तो मूळचा धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील रहिवासी आहे़

ठळक मुद्दे वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यूढकांबे येथील घटना : वाघ महाविद्यालयाचा विद्यार्थी

नाशिक : रविवारी सुटीनिमित्त मित्रांसमवेत दुचाकीवर फिरण्यासाठी गेलेल्या दिंडोरी रोडवरील वाढणे कॉलनीतील बावीस वर्षीय युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२४) दुपारी ढकांबे शिवारात घडली़ शुभम कैलास शिंदे (२२, रा़ गजपंथ विहार, म्हसरूळ) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव असून, तो मूळचा धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील रहिवासी आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा साक्री तालुक्यातील राजभाई शेवाळी येथील रहिवासी असलेला शुभम शिंदे हा आडगाव शिवारातील क़ का़ वाघ महाविद्यालयात एमसीएसचे शिक्षण घेत होता़ मावशीकडे शिकण्यासाठी आलेला शुभम रविवारी आपल्या पाच मित्रांसमवेत तीन दुचाकींवर फिरण्यासाठी गेला होता़ शुभमसोबतचे चार मित्र हे दोन दुचाकींवर तर शुभम हा एका दुचाकीने दुपारी म्हसरूळला घरी येत होते़ दिंडोरी रोडवरील ढकांबे शिवारात दुपारी चार वाजेच्या सुमारास समोरून आलेल्या भरधाव वाहनाने शुभमच्या दुचाकीस धडक दिली़या अपघातात शुभमच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्याच्या दोन्ही कानातून व नाकातून रक्त वाहू लागले़ त्याच्या मित्रांनी तत्काळ १०८ अ‍ॅम्ब्युलन्सने फोन करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ ठाकूर यांनी तपासून मयत घोषित केले़ एकुलता एक मुलगाअपघातात मृत्युमुखी पडलेला शुभम शिंदे हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता़ त्याने संगणक शाखेचे शिक्षण घेण्यासाठी वाघ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तो मावशीकडे राहात होता़ रविवारी सुटी असल्याने तो मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेला होता़