शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अपघातातील भावानंतर बहिणीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:05 IST

वडनेर रस्त्यावरून पाथर्डी फाट्याकडे बहिणीसोबत दुचाकीने जात असताना समोरून भरधाव जाणाºया ट्रकने दिलेल्या धडकेत सागर बंडू कासार (शेवगेदारणा, देवळाली कॅम्प) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़१४) दुपारी घडली होती़, तर अपघातात गंभीर जखमी झालेली त्याची बहीण योगीता शिंदे हिचा उपचारादरम्यान रविवारी (दि़१७) मृत्यू झाला़

इंदिरानगर : वडनेर रस्त्यावरून पाथर्डी फाट्याकडे बहिणीसोबत दुचाकीने जात असताना समोरून भरधाव जाणाºया ट्रकने दिलेल्या धडकेत सागर बंडू कासार (शेवगेदारणा, देवळाली कॅम्प) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़१४) दुपारी घडली होती़, तर अपघातात गंभीर जखमी झालेली त्याची बहीण योगीता शिंदे हिचा उपचारादरम्यान रविवारी (दि़१७) मृत्यू झाला़ या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे़ शेवगेदारणा येथील सागर हा त्याची बहीण योगीता हिला सातपूर गावात सासरी सोडण्यासाठी दुचाकीवरून (एमएच १५ एफएल ८५२०) जात होता. पाथर्डी फाट्याजवळ समोरून भरधाव येणाºया ट्रकचालकाने (एमएच १२ एएफ ८४९६) सागरच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दोघेही बहीण-भाऊ रस्त्यावर फेकले गेल्याने सागरच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर बहीण योगीता ही गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते़ दरम्यान, जखमी योगीता हिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा रविवारी तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला़ भावाच्या पाठोपाठ जखमी बहिणीचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे़ कासार-शिंदे कुटूंबियांवर मोठा आघात झाला असून आठवड्याभरात कुटूंबातील बहिण-भावांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने दोन्ही कुटूंबांवर दु:ख कोसळले आहे.