नाशिक : शहरात डेंग्यू संशयित दोघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी डेंग्यू संशयित व डेंग्यूने मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या संख्येत घट झाल्याचा कागदोपत्री दावा केला आहे. मागील वर्षी डेंग्यूमुळे चार तसेच डेंग्यू संभावित पाच व संशयित चार अशा एकूण तेरा जणांचा मृत्यू ओढवला होता. यावर्षी मात्र तापामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात दोन जणांचा डेंग्यूने संभाव्य परंतु निश्चित न झाल्याने तसेच सहा जणांच्या मृत्यूबाबत डेंग्यूची निश्चिती न झाल्याचे स्पष्ट केले आहे. मागील वर्षी जानेवारी २०१३ ते आॅक्टोबर २०१३ या काळात नाशिकच्या ग्रामीण भागात ३७० जणांचे रक्तजल घेण्यात आले. त्यात ९५ जणांचे रक्तजल दूषित आढळले. त्यात दोन जणांचा डेंग्यूने, तिघांचा डेंग्यू संशयित म्हणून, तर तीन जणांचा संभाव्य डेंग्यूने मृत्यू झाला होता. नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्'ात २०१३ यावर्षी एकूण ८२८ जणांचे रक्तजल घेण्यात येऊन त्यातील २८८ जणांचे रक्तजल दूषित आढळले होते. त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी चौघांची डेंग्यूची निश्चिती झाली होती. तसेच पाच जणांचा डेंग्यू संशयित, तर चौघांचा डेंग्यू संभाव्य तापाने मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे यावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर २०१४ या काळात जिल्'ात एकूण ९०६ रक्तजल घेण्यात येऊन त्यापैकी ३०९ रक्तजल दूषित आढळले. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी डेंग्यूसदृश आजाराने दोघांचा, तर अन्य सहा जणांच्या मृत्यूची निश्चिती प्रलंबित असल्याचे जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
मागील वर्षाच्या तुलनेत मृत्यूत घट
By admin | Updated: November 8, 2014 00:24 IST