शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी जवानाच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:06 IST

तालुक्यातील ढेकू येथे एका लष्करी जवानाच्या घरात रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जवानाचा मामेभाऊ बाजीराव म्हस्के (४०) ठार झाल्याची घटना रविवारी घडली. प्राथमिक माहितीनुसार सदर घटना घडली तेव्हा त्याठिकाणी मयत इसम, त्याची पत्नी, सैनिकाचा मुलगा व पत्नी असे चौघेजण होते. मालेगाव पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असली तरी नांदगाव पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. जवान काकासाहेब साधबळे जम्मूमध्ये लष्कराच्या सेवेत कार्यरत आहेत.

नांदगाव : तालुक्यातील ढेकू येथे एका लष्करी जवानाच्या घरात रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जवानाचा मामेभाऊ बाजीराव म्हस्के (४०) ठार झाल्याची घटना रविवारी घडली. प्राथमिक माहितीनुसार सदर घटना घडली तेव्हा त्याठिकाणी मयत इसम, त्याची पत्नी, सैनिकाचा मुलगा व पत्नी असे चौघेजण होते. मालेगाव पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असली तरी नांदगाव पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. जवान काकासाहेब साधबळे जम्मूमध्ये लष्कराच्या सेवेत कार्यरत आहेत. काकासाहेब मूळचे सहानगाव ता. वैजापूर (औरंगाबाद) येथील रहिवासी आहेत. त्यांनी ढेकू येथे शेती विकत घेतल्याने त्यांची पत्नी, मुलगा राहुल व वडील काकासाहेब साधबळे ढेकू येथे स्थलांतरित झाले असून, ते तिथेच राहतात. मयत बाजीराव रा. हिंगणे, ता. कन्नड आपली पत्नी यमुनाबाई हिला घेऊन ऋ षिपंचमीच्या पूजेसाठी आले होते. त्यानंतर ते साधबळेच्या घरी आले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास, कुतूहलापोटी राहुल, बाजीराव व यमुनाबाई रिव्हॉल्व्हर बघत असताना अचानक ते लोड झाले व खटका दाबला गेला, अशी माहिती आहे. यमुनाबाई की राहुल यापैकी नेमकी कोणाकडून गोळी उडाली हे अद्याप संदिग्ध आहे. पिस्तुलातून निघालेल्या गोळीने बाजीरावचा वेध घेतला. अत्यंत जवळून निघालेली गोळी बाजीराव यांच्या छाती व पोटाच्या मध्यभागाचा वेध घेत, त्यांच्या पाठीतून उजव्या बाजूकडे आरपार निघाली. गोळी लागल्याने अत्यंत गंभीर जखमी झालेल्या बाजीराव यास तातडीने मालेगाव येथील प्रयाग हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मालेगावच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मयत बाजीराव याचे शव अंत्यविधीसाठी हिंगणे येथे रवाना करण्यात आले आहे. ढेकू येथील घरात न वापरलेले काडतूस सापडले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बशीर शेख, पोलीस उपनिरीक्षक बालाजी पदमने, रमेश पवार आदी पुढील तपास करत आहेत.दरम्यान बाजीराव म्हस्के यांच्या मृत्यूला पुतण्या नवनाथ म्हस्के याने राहुल यास जबाबदार धरले आहे.मयताची पत्नी यमुनाबाई मानसिक धक्क्यातून सावरलेली नसल्याने पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण झाला आहे. तसेच राहुलच्या म्हणण्यानुसार तो झोपलेला होता. आवाजाने जाग आली तेव्हा ही दुर्घटना दिसली. सकृतदर्शनी संशयाची सुई राहुलकडे वळत असली तरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी यमुनाबाईच्या जबाबाची प्रतीक्षा आहे. एकंदरीत या घटनेच्या पाठीमागच्या सर्व शक्यता पडताळून बघण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलीस करत होते.