पिंपळगाव बसवंत : शहरातील अश्विनी देवीदास पवार (१५) हिचा सकाळी अहेरगाव रस्ता येथे पाराशरी नदीवर आंघोळीला गेली असताना पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ती मतिमंद होती. शवविच्छेदन झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अनिल गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे, संतोष गांगुर्डे, एकनाथ झनकर, नितीन गायकवाड, लक्ष्मण गांगुर्डे, दत्ता मोरे, बाबा खरात, श्याम गांगुर्डे आदिंनी तिचा अंत्यविधी केला. मिळेल ते खाऊन ती कुठेतरी झोपायची. एकभाऊ तोही आजारी, बहीण बाहेरगावी, घरच्यांचा थांगपत्ता नाही अशी परिस्थिती असताना तिचा अंत्यविधी कसा करायचा हा प्रश्न पोलिसांपुढे होता. मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून या मुलीवर अंत्यविधी केला करण्यात आला. (वार्ताहर)
पाराशरी नदीत पडून मुलीचा मृत्यू
By admin | Updated: August 26, 2016 22:03 IST