सिन्नर : तालुक्यातल्या सोनांबे येथे विद्युत जलपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याला वीजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. संदीप भरत डगळे (२८) हा तरुण शेतकरी सकाळी काकडी खुडण्याचे काम करीत होता. त्यावेळी वीज आल्याने तो विद्युत जलपंप सुरु करण्यासाठी विहिरीजवळ गेला. विद्युत जलपंप सुरु करीत असतांना वीजेचा धक्का लागला. परिसरातील शेतकऱ्यांनी त्याला तातडीने सिन्नरच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी संदीप यास मृत घोषीत केले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन मंडलिक, राहूल निरगुडे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
सोनांबे येथे वीजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Updated: September 2, 2016 22:23 IST