नाशिक : वीज वितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सोपान राठोड या कामगाराचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे सुरगाणा येथील सोपान राठोड (३६) हे गेल्या अनेक वर्षांपासून विद्युत वितरण विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करतात़ बुधवारी दुपारी शिंदे-नायगाव रस्त्यावरील तिरुपती लॉन्स येथे वीज दुरुस्तीचे काम करीत असताना, त्यांना विजेचा धक्का लागल्याने ते गंभीररीत्या भाजले गेले़ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे़ (प्रतिनिधी)