नाशिक : विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या सातपूर परिसरातील इसमाचा उपचारादरम्यान सोमवारी (दि़७) मृत्यू झाला़ महेश माधवराव ठाकरे (३८, रा. मातोश्री पार्क, श्रमिकनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. २५ मे रोजी श्रमिकनगरमधील शनिमंदिरात विद्युत रोषणाई करीत असताना ठाकरे यांना विजेचा धक्का लागला होता़ त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांचा दुपारी मृत्यू झाला.
विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 01:07 IST