शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतप्रवाहामुळे आठ म्हशींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:39 IST

पंचवटी : विद्युत वितरण कंपनीची वायर तुटून गायी-म्हशीच्या गोठ्यावर पडल्याने लोखंडी पत्र्यात उतरलेल्या वीजप्रवाहामुळे तब्बल आठ म्हशी दगावल्याची घटना औरंगाबाद रोडवरील सिद्धिविनायक लॉन्सशेजारी असलेल्या पवन डेअरीत रविवारी (दि.१८) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ या गोठ्यावरून विद्युत वितरण कंपनीची वायर गेल्याने ही घटना घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देदुर्घटना : दहा लाखांचे नुकसान सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान

 

 

पंचवटी : विद्युत वितरण कंपनीची वायर तुटून गायी-म्हशीच्या गोठ्यावर पडल्याने लोखंडी पत्र्यात उतरलेल्या वीजप्रवाहामुळे तब्बल आठ म्हशी दगावल्याची घटना औरंगाबाद रोडवरील सिद्धिविनायक लॉन्सशेजारी असलेल्या पवन डेअरीत रविवारी (दि.१८) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ या गोठ्यावरून विद्युत वितरण कंपनीची वायर गेल्याने ही घटना घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादरोडवरील सिद्धिविनायक लॉन्सशेजारी पवन लोहट यांच्या मालकीचा गुरांचा गोठा (पवन डेअरी) आहे़ लोहट यांच्या डेअरी उत्पादनासाठी या गोठ्यामध्ये शंभर म्हशी आहेत़ विद्युत वितरण कंपनीने काही दिवसांपूर्वीच या गोठ्याच्या वरून विद्युतवाहिनी टाकली होती. रविवारी हवा सुटल्याने पोलवरील वीजवाहिनी हलून विजेच्या तारांचा गोठ्यावरील लोखंडी पत्र्यांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट झाले़ यामुळे विद्युतप्रवाह गोठ्यात उतरून एका रांगेत बांधलेल्या आठ म्हशींना विद्युतप्रवाहाचा झटका बसल्याने त्या जागीच ठार झाल्या.आडगाव पोलीस व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहणी केली तर पोलिसांनी पंचनामा केला़ रविवारी सकाळी या गोठ्यात विद्युतप्रवाह उतरून म्हशी दगावल्या त्यावेळी काही कामगारही गोठ्यात काम करीत होते़ सुदैवाने वीजप्रवाह उतरल्याचे लक्षात आल्याने कामगारांनी गोठ्याबाहेर पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले़वीज वितरणच्या चुकीमुळे घटनाऔरंगाबादरोड वरील पवन डेअरीजवळ वीज वितरण कंपनीने वीजवाहिनी टाकली होती. या वीजवाहिनीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांना विरोधही केला होता, मात्र तरीही वीज वितरण कंपनीने ही वीजवाहिनी टाकली़ रविवारी सकाळी शॉर्टसर्किट होऊन वीजप्रवाह उतरल्याने गोठ्यातील आठ म्हशी दगावल्या़ यामुळे सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.- पवन लोहट, डेअरीचालक