शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

हरणगाव धरणात बुडून मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:52 IST

पेठ : सुटीच्या काळात आसरबारी येथे मामाच्या गावी आलेल्या नातेवाइकांसमवेत हरणगावनजीक असलेल्या धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच मुली अंघोळीसाठी पाण्यात उतरल्याने बुडल्या. पैकी एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जवळच असलेल्या तीन लहान मुलांनी जिवाची बाजी लावत चार मुलींना वाचवले.

ठळक मुद्देदुर्घटना : पाचपैकी चार मुलींना वाचविण्यात यश

पेठ : सुटीच्या काळात आसरबारी येथे मामाच्या गावी आलेल्या नातेवाइकांसमवेत हरणगावनजीक असलेल्या धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच मुली अंघोळीसाठी पाण्यात उतरल्याने बुडल्या. पैकी एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जवळच असलेल्या तीन लहान मुलांनी जिवाची बाजी लावत चार मुलींना वाचवले.आसरबारी येथील जयश्री कमलाकर भुसारे, साक्षी कमलाकर भुसारे (१४) ज्योती तुकाराम जाधव (१२), अर्चना तुकाराम जाधव (१६) व दीक्षा तुकाराम जाधव (११) या पाच मुली हरणगाव येथील धरणात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुऊन वाळत टाकल्यानंतर पोहण्याची इच्छा झाल्याने पाचही मुलींनी धरणात उड्या घेतल्या. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने साक्षी भुसारे व ज्योती जाधव बुडू लागल्या. मुलींचा ओरडाओरडा ऐकून परिसरातच असलेल्या तीन मुलांनी घटनास्थळी धाव घेत जिवाची पर्वा न करता या मुलींना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. साक्षीला वाचविण्यात या छोट्या मुलांना यश आले. मात्र ज्योती तुकाराम जाधव पाण्याखाली गेल्याने वाचवणे कठीण झाले. सदरची घटना कळताच हरणगाव, आसरबारीसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. सायंकाळपर्यंत प्रयत्न करून रात्री ८ च्या सुमारास ज्योतीचा मृतदेह हाती लागला. याबाबत पोलीसपाटील गेणुदास जाधव यांनी पेठ पोलिसांना खबर दिली.पोलीस पथकाने पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांना पाचारण केले. मयत ज्योती जाधव या मुलीचे वडील तुकाराम जाधव हे कल्याण येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. याबाबत पेठ पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास करीत आहेत.तिघांनी केले शर्थीचे प्रयत्नधरणात मुली बुडत असल्याचे लक्षात येताच परिसरात असलेले देवानंद मुरलीधर गायकवाड, हर्षद रघुनाथ जाधव व पंडित रोहिदास गायकवाड या १०-१२ वर्षीय मुलांनी धरणाकडे धाव घेऊन जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. एका मुलीला वाचवत पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले; मात्र ज्योती जाधव हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही लहान मुले वेळेत हजर झाली नसती तर मोठे संकट ओढवणार होते. सदर घटनने आसरबारी गावावर शोककळा पसरली. साक्षी व जयश्री या दोन्ही दिंडोरी तालुक्यातील सादराळे गावच्या असून, सुटीनिमित्त आसरबारी येथे मामाच्या गावी आल्या होत्या.