शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदांना फलक हटविण्यासाठी ‘डेडलाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:44 IST

नाशिक : ग्रामीण तथा निमशहरी क्षेत्रात राजकीय पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांची चमकोगिरी त्रासदायक ठरत असून, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायती क्षेत्रातील फलक हटविण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याची शुक्रवारी (दि. २४) डेडलाइन असून, शासनाने आदेशांचे अनुपालन होते किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व प्रादेशिक उपसंचालकांवर सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देकायमस्वरूपी महापालिकेने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.

नाशिक : ग्रामीण तथा निमशहरी क्षेत्रात राजकीय पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांची चमकोगिरी त्रासदायक ठरत असून, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायती क्षेत्रातील फलक हटविण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याची शुक्रवारी (दि. २४) डेडलाइन असून, शासनाने आदेशांचे अनुपालन होते किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व प्रादेशिक उपसंचालकांवर सोपविण्यात आली आहे.चमकोगिरीसाठी होर्डिंग्ज (फलक)चे वाढते पेव असून दादा, नाना आणि बाबा यांसारख्या नेत्यांच्या छबी आणि अभीष्टचिंतनाने नागरिक त्रस्त आहेत. अशा पोस्टरबाजीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीनुसार नगरपालिका आणि नगरपंचायतींना बेकायदा जाहिराती, होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि फलक हटविण्याचे आदेश जानेवारी महिन्यातच दिले होते. नगरपरिषद संचालनालयाने नगरपालिकांना २० ते २४ आॅगस्टदरम्यान अशाप्रकारच्या बेकायदा जाहिराती आणि होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी (दि. २४) त्याचा शेवटचा दिवस असून आदेशाची अंमलबजावणी झाली किंवा नाही, याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि प्रादेशिक उपसंचालकांवर सोपविण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर फलक हटविण्याची मोहीम राबविली जाते, परंतु नंतर पुन्हा फलकबाजी सुरू होते. त्यामुळे शहराला बाधा निर्माण होते. मात्र त्यावर कायमस्वरूपी महापालिकेने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.