शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘सेंट्रल किचन’च्या नियमावलीवर हरकती घेण्यास ६ मेपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:38 IST

नाशिक : सेंट्रल किचनच्या नव्याने ठेके देण्याबाबत प्रक्रिया सुरू करताना ऐन लॉकडाउन आणि संचारबंदीचा मुहूर्त प्रशासनाने शोधल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशासनाने सावध भूमिका घेत प्रारूप नियमावलीवर हरकती आणि सूचनेसाठी ६ मेपर्यंत मुदत वाढविली आहे.

नाशिक : सेंट्रल किचनच्या नव्याने ठेके देण्याबाबत प्रक्रिया सुरू करताना ऐन लॉकडाउन आणि संचारबंदीचा मुहूर्त प्रशासनाने शोधल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशासनाने सावध भूमिका घेत प्रारूप नियमावलीवर हरकती आणि सूचनेसाठी ६ मेपर्यंत मुदत वाढविली आहे. अर्थात, यापूर्वीच्या महासभेच्या ठरावाबाबत प्रशासनाने तो उच्च न्यायालयाच्या आदेशाशी विसंगत असल्याच्या कारणावरून निलंबित केल्याचा दावा आयुक्तांनी आहे. मात्र, या ठेक्यातील दोषाची माहिती प्रशासनाला का पाठविली नाही, असा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी उपस्थित केलेला प्रश्न कायम आहे.  गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नाशिक शहरातील महापालिका आणि खासगी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार पाठविण्यासाठीनिविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यातील घोळ आणि पोषण आहारातील तक्रारींच्या आधारे डिसेंबर महिन्यात झालेल्या महासभेत वादळी चर्चा झाली.या ठेक्यातील सर्व घोळाबाबत चर्चा झाल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी सर्व ठेके रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. हा ठराव महासभेने २७ मार्च रोजी रद्द केला.  दरम्यान, ७ जानेवारीस आयुक्तांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यातही पुन्हा सर्व घोळच आढळल्याने आयुक्तांनीदेखील १३ ठेके रद्द केले. महासभेचे ठराव प्रशासनाने शासनाकडे पाठवितांना आयुक्तांनी त्यावर आपला वस्तुनिष्ठ अहवालदेखील पाठविणे आवश्यक होते. तो का पाठविला नाही याबाबत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी विचारणा केल्यानंतर गुरुवारी (दि.१६) प्रशासनाने याबाबत खुलासा केला आहे. त्यात महासभेचा ठराव हा उच्च न्यायालयातील आदेशाशी विसंगत असल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक