शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

दिवस-रात्र एक करून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST

मालेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांसह गणेशमूर्ती विसर्जन मार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी महापालिका प्रशासनाला धारेवर ...

मालेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांसह गणेशमूर्ती विसर्जन मार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या शांतता समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करीत तक्रारींचा पाऊस पडला होता. मंगळवारी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी शांतता समितीच्या बैठकीला हजेरी लावत दिवसरात्र एक करून येत्या दोन दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन दिले.

याच बैठकीत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरवा, मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी करा. विसर्जनापूर्वी रस्ते खड्डे मुक्त करा. येत्या दोन दिवसात दृश्य स्वरूपात काम दिसले पाहिजे, असे खडे बोल सुनावले. पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात मंगळवारी शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, आयुक्त गोसावी, उपअधीक्षक लता दोंधे, प्रदीप जाधव, मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष केवळ हिरे, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, अग्निशमन दल प्रमुख संजय पवार, पाणीपुरवठा विभागाचे जयपाल त्रिभुवन आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख रामा मिस्तरी यांनी शहरातील रस्ते दुरुस्ती, पथदिप आदि माफक अपेक्षा नागरिकांच्या आहेत. डी. के. कॉर्नर ते टेहरे चौफुली पर्यंतचा रस्ता पोलीस अधीक्षक निवास ते श्रीराम नगर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. कैलास तिसगे यांनी कुठल्याही सणाच्या आधी एक महिना आधी शांतता समितीची बैठक घ्यावी. या बैठकीतील सूचनांची अंमलबजावणी करावी. मनपा सण, उत्सव असतील तेव्हाच काम करेल का? असा सवाल उपस्थित केला.

---------------------

अपर जिल्हाधिकारी निकम यांनी महापालिकेने विसर्जनासाठी तात्पुरते १३ गणेश कुंड उभारावेत, अशी सूचना केली. विसर्जनापूर्वी शहर खड्डे मुक्त करावे, असेही सांगितले. अपर पोलीस अधीक्षक खांडवी म्हणाले की, गुन्हेगार व समाजकंटक म्हणून नोटीसा बजावण्यात आल्या नाहीत. त्याचे कोणी वाईट वाटून घेवू नये. प्रशासकीय बाब म्हणून नोटीसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी, मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : ०७ एमएसईपी ०४ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी. समवेत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे आदि.

070921\305807nsk_37_07092021_13.jpg

फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.