शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दिवस-रात्र एक करून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 20:03 IST

मालेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांसह गणेश विसर्जन मार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या शांतता समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करीत तक्रारींचा पाऊस पडला होता. मंगळवारी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी शांतता समितीच्या बैठकीला हजेरी लावत दिवस - रात्र एक करुन येत्या दोन दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देमालेगावी शांतता समितीच्या बैठकीत मनपा आयुक्तांचे आश्वासन

मालेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांसह गणेश विसर्जन मार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या शांतता समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करीत तक्रारींचा पाऊस पडला होता. मंगळवारी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी शांतता समितीच्या बैठकीला हजेरी लावत दिवस - रात्र एक करुन येत्या दोन दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन दिले.याच बैठकीत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरवा, मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी करा. विसर्जनापूर्वी रस्ते खड्डे मुक्त करा. येत्या दोन दिवसात दृश्य स्वरूपात काम दिसले पाहिजे, असे खडे बोल सुनावले. पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात मंगळवारी शांतता समितीची बैठक झाली.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, आयुक्त गोसावी, उपअधीक्षक लता दोंधे, प्रदीप जाधव, मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष केवळ हिरे, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, अग्निशमन दल प्रमुख संजय पवार, पाणीपुरवठा विभागाचे जयपाल त्रिभुवन आदि उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख रामा मिस्तरी यांनी शहरातील रस्ते दुरुस्ती, पथदिप आदि माफक अपेक्षा नागरिकांच्या आहेत. डी. के. कॉर्नर ते टेहरे चौफुली पर्यंतचा रस्ता पोलीस अधीक्षक निवास ते श्रीराम नगर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली.

कैलास तिसगे यांनी कुठल्याही सणाच्या आधी एक महिना आधी शांतता समितीची बैठक घ्यावी. या बैठकीतील सूचनांची अंमलबजावणी करावी. मनपा सण, उत्सव असतील तेव्हाच काम करेल का? असा सवाल उपस्थित केला.अपर जिल्हाधिकारी निकम यांनी महापालिकेने विसर्जनासाठी तात्पुरते १३ गणेश कुंड उभारावेत, अशी सूचना केली. विसर्जनापूर्वी शहर खड्डे मुक्त करावे, असेही सांगितले. अपर पोलीस अधीक्षक खांडवी म्हणाले की, गुन्हेगार व समाजकंटक म्हणून नोटीसा बजावण्यात आल्या नाहीत. त्याचे कोणी वाईट वाटून घेवू नये. प्रशासकीय बाब म्हणून नोटीसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी, मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : ०७ एमएसईपी ०४ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी. समवेत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे आदि.

टॅग्स :MalegaonमालेगांवMuncipal Corporationनगर पालिका