शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनांचा दिवस

By admin | Updated: September 2, 2016 22:22 IST

देशव्यापी संप : रास्ता रोको; मोर्चा तर शिक्षकांचा ठिय्या

सिन्नर : केंद्र व राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणामुळे केंद्रीय व राज्य कर्मचारी महासंघ, कामगार संघटना कृती समिती, शिक्षक संघटना व विडी कामगारांनी लाक्षणिक संप पुकारुन आंदोलने केली. कामगार, शिक्षक, केेंद्र व राज्य कर्मचारी यांनी केलेल्या आंदोलनामुळे शुक्रवारचा दिवस ‘आंदोलनाचा दिवस’ ठरला. शिक्षक संघटनेने तहसील कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. कामगार संघटना कृती समितीच्यावतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले तर सिन्नर तालुका विडी कामगार संघाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. या तीन आंदोलनामुळे शुक्रवारी सकाळपासून गर्दी दिसून येत होती.रास्ता रोको व निवेदन सीटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली कामगार, कर्मचाऱ्यांंनी शनिवारी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारकाजवळून मोर्चा काढला. मोर्चात शासनविरोधी घोषणा देण्यात येत होत्या. नाशिक जिल्हा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात कारखाना कामगारांसह राज्य कर्मचारी संघटनेचे सभासद सहभागी झाली होते. कामगार कायद्यातील कामगार विरोधी व मालक धार्जिणे बदल रद्द करा. कामगार कायद्याची कडक अंमल बजावणी करा. खाजगीकरण-कंत्राटीकरण-आऊटसोर्सिंगचे धोरण व निर्णय मागे घ्या. शिक्षणाचा बाजार बंद करुन सर्वांना मोफत व दर्जेदार शिक्षण द्या. केंद्र व राज्य शासनाच्या खात्यांसह जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिकेतील ११ लाख रिक्त पदे त्वरित भरा. यंत्रमाग व बिडी कामगारांना शासनाने जाहिर केलेले किमान वेतन लागू करा. बांधकाम कामगारांना विमा, पेन्शन, बोनस आणि शेतमजूर, घरकामगारांसह अन्य असंघटीत कामगारांना नोंदणी करुन कल्याण मंडळामार्फत आरोग्य, विमा, पेन्शन लागू करा. बांधकाम, घरेलू कामगार आदिंच्या कल्याणकारी मंडळाचे पुनर्गठण करुन मान्यता द्या. कामगार संघटनांना मंडळावर सदस्यतेच्या आधारावर योग्य प्रतिनीधीत्व द्या. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण व विक्री रद्द करा. रेल्वे, विमा, किरकोळ व्यापार, औषधे, संरक्षण क्षेत्रातील थेट गुंतवणुकीचे धोरण मागे घ्या. भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसी, पेन्शन योजना यासाठीचा निधी सट्टाबाजारात गुंतविण्याचा निर्णय मागे घ्या. आदिंसह विविध मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता. मोर्चा वावीवेशीच्या चौफुलीवर आल्यानंतर कामगारांना रास्ता रोको आंदोलन केले. घटनास्थळी तहसीलदार मनोजकुमार खैरनार, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी येवून निवेदन स्विकारले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी सीटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, संतोष कुलकर्णी, रवींद्र गिरी, दत्ता वायचळे, अरुण घोडेराव, विकास जाधव, सुधाकर राऊत, गोविंद शिंदे, भरत गोळेसर, सूर्यभान सांगळे, किशोर सूर्यवंशी, माणिक रानडे, शरद वेलजाळी, विलास जाधव, बी. पी. ठोंबरे, धर्मा होन यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.