शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दुपारनंतर उघडीप; पूर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:18 IST

शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी (दि.२९) जोर धरला होता; मात्र दुपारी १२ वाजेपासून पावसाने उघडीप दिली.

नाशिक : शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी (दि.२९) जोर धरला होता; मात्र दुपारी १२ वाजेपासून पावसाने उघडीप दिली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्गही कमी करण्यात आल्याने गोदावरीचा पूर ओसरला. रात्रीपासून शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू होता. सकाळीदेखील पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे गोदावरीच्या पुराची तीव्रता वाढते की काय, अशी भीती नाशिककरांसह प्रशासनालाही वाटत होती; मात्र दहा वाजेपासून पावसाचा जोर कमी झाला आणि बारावाजेपर्यंत पावसाने उघडीप दिली. दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे गंगापूर धरणातूनही विसर्ग सकाळपासून ‘जैसे-थे’ ठेवण्यात आला होता. गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने शांतपणे वाहणाºया गोदामाईसोबत ‘सेल्फी’ घेण्यासाठी संध्याकाळी तरुणाईची गोदाकाठावर गर्दी झाली होती. पावसाने उघडीप दिल्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुपारपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांची वर्दळ वाढल्याचे चित्र पहावयास मिळाले. बाजारपेठांमध्येही नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे विक्रेत्यांनाही दिलासा मिळाला. नाशिककरांचे पारंपरिक पर्जन्यमापक मानल्या जाणाºया गोदापात्रातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत होती. पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने दिवसभरात शहरात ९ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद केली आहे.