शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

दौलतराव कडलग प्रेरणा पुरस्कारांचे वितरण

By admin | Updated: April 23, 2017 02:20 IST

नाशिक : शेतीक्षेतात्रात प्रयोगशीलता आणि कर्तव्यनिष्ठेच्या वेगवेगळ्या मार्गाने ओळख निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना आयसीएतर्फे गौरविण्यात आले.

नाशिक : शेतीक्षेतात्रात प्रतिकूल स्थितीचा सामना करून प्रयोगशीलता आणि कर्तव्यनिष्ठेच्या वेगवेगळ्या मार्गाने विशिष्ट ओळख निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना आयसीएतर्फे (इंडियन चेंबर आॅफ अ‍ॅग्रीकल्चर) दौलतराव कडलग प्रेरणा पुरस्कार-२०१७ ने गौरविण्यात आले. या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून आयसीएची कार्यपद्धती, शेतकरी, बाजार समिती, प्रशासन स्तरावर चालणाऱ्या कामकाज याविषयी तसेच शेतकऱ्यांना शेती करताना मार्गदर्शन गोष्टींचे ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे शुक्रवारी (दि.२१) कृषी क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या अकरा पुरस्कारार्थींना दौलतराव कडलग पुरस्कार २०१७ प्रदान करण्यात आले.दरम्यान, पंजाबराव पाटील यांच्या अनुपस्थितीत मनोज दंडगव्हाळ यांनी, तर शेखर गायकवाड यांच्या अनुपस्थितीत राजेंद्र सोनवणे यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रास्ताविक साहेबराव क्षीरसागर यांनी केला, तर प्र्रतीक्षा शिंदे व कवी प्रा. संदीप जगताप यांनी सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत भरली. प्रा. जगताप यांनी कार्यक्रमादरम्यान सादर केलेल्या नोटाबंदी, काळी माती, शेतकरी आत्महत्त्या आदि विषयांवरील कवितांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यावेळी आयसीएचे अध्यक्ष शिवनाथ बोरसे, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ जयराम पूरकर, व्यंकटेश जोशी, नाशिक सीए असोसिएशनचे अध्यक्ष विकास हासे, महापालिका नगरसेवक विलास शिंदे, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)