शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणूनच संघर्ष

By admin | Updated: August 24, 2015 23:26 IST

पंकजा मुंडे : व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची सहविचार सभा

नाशिक : मी राजघराण्यात जन्माला आलेली नाही, पण एका राजाच्या पोटी जन्म घेतला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. संघर्षातून त्यांनी एक वेगळी उंची गाठली. मलाही आता सत्ता आली तरी संघर्ष करावा लागत आहे. पण संघर्ष नसला, तर मी मुंडेच्या पोटची मुलगी कसली, असे प्रतिपादन ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले.क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेला पंकजा मुंडे यांनी भेट दिली. त्यावेळी झालेल्या सहविचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, उपाध्यक्ष सुहास कांदे, व्हि. एन. नाईकचे माजी अध्यक्ष एन. एम. आव्हाड, किशोर दराडे, पंढरीनाथ थोरे, लक्ष्मण जायभावे, बी. पी. आव्हाड, प्रभाकर धात्रक, बबनराव सानप, मनीषा बोडके, प्रकाश घुगे, विक्रांत चांदवडकर, दामोदर मानकर, मनीषा हेकरे, गोविंद केंद्रे, संपत वाघ, विठ्ठल चांदे, उदय सांगळे आदि उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक करताना हेमंत धात्रक यांनी संस्थेच्या अनुदानाबाबतच्या अडचणींचा पाढा वाचला. तसेच भगवान गड येथे गोपीनाथ गड उभारण्यासाठी व्ही. एन. नाईक संस्थेच्या मार्फत नाशिकमधून निधी उभारण्याबाबतची माहिती दिली. अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी भाषणात सांगितले की, गोपीनाथ मुंडे हे केवळ वंजारी समाजाचे नेते नव्हे तर ते बहुजन समाजाचे नेते होते. त्यांना एका विशिष्ट समाजात अडकविणे चुकीचे ठरेल. यावेळी त्यांनी संस्थेच्या अडचणी सांगितल्या. पंकजा मुंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुंडे साहेबांची जागा घेण्याइतपत मी मोेठी नाही. त्यांची जागा मी कधीही घेऊ शकणार नाही. मात्र त्यांनी ज्या रस्त्यावर चालण्यासाठी मला उभे केले, त्या रस्त्यावर चालण्यासाठी मी जीवन वाहून घेतले आहे. मुंडे साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. संघर्षातून ते मोठे झाले. आपण कोणत्याही राजघराण्यात जन्माला आलेले नाही. मात्र एका राजाच्या पोटी जन्म घेतला आहे. आताही माझ्यावर अनेक संकटे आली. मी थोडेसे घाबरले होते. मात्र जीवनात संघर्ष नसला तर मी मुंडेंची मुलगी कसली, असे पंकजा यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंडे साहेबांचा जाती-पाती, वंशवाद, घराणेवाद, पक्षवाद यांच्यावर विश्वास नव्हता. मात्र मला माझ्या समाजाचा अभिमान बाळगण्यात गैर वाटत नाही. मी या संस्थेचे पालकतत्व स्वीकारले असून, माझ्या लोकांना दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)