पंचवटी : स्वामी मित्रमेळा प्रतिष्ठान यांच्या वतीने येत्या रविवारपासून गंगाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर दत्तपुराण कार्यक्रम होणार आहे. स्वामी सखा सुमंत सरस्वती हे दत्तपुराण कथन करणार आहेत. रविवारी सायंकाळी ६ वाजता गुरूपूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येईल. सलग दहा दिवस दत्तपुराण कार्यक्रम होणार असून या दत्तपुराणात कार्य, श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ महाराज, माणिकप्रभू, टेंभेस्वामी, या अवतार कार्याचे सखोल प्रबोधन करणार आहेत. (प्रतिनिधी)
यशवंत पटांगणावर रविवारी दत्तपुराण
By admin | Updated: March 5, 2016 00:07 IST