शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

विद्यार्थ्यांना मिळते तारीख पे तारीख

By admin | Updated: July 8, 2014 01:09 IST

विद्यार्थ्यांना मिळते तारीख पे तारीख

 

विंचूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ‘आयटीआय’ने गत वर्षापासून आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. मात्र त्यात नियोजनाचा अभाव असल्याने प्रवेशप्रक्रियेसाठी तारीख पे तारीख दिली जात असून, या प्रकारामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत.पहिल्या वर्षी आॅनलाइन प्रक्रिया कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांना आयटीआयच्या गलथान कारभाराचा फटका बसला होता. उशिरा सुरू झालेली प्रवेशप्रक्रिया, वारंवार सर्व्हर डाऊन होणे, गुणवत्तेनुसार यादी नसणे याला कंटाळून विद्यार्थ्यांनी वर्ष वाया जाण्याच्या भीतीने आयटीआयचा नाद सोडून देत दुसऱ्या शाखांमध्ये प्रवेश घेतले. अनेक विद्यार्थ्यांना सर्व प्रवेश फेऱ्या करूनही आयटीआयला प्रवेश मिळाला नाही, तर दुसरीकडे मुदत संपल्यामुळे इतर शाखांचे प्रवेश बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे नाहक वर्ष वाया गेले. मागील अनुभव पाहता वेळेवर प्रवेश सुरू करून आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता असताना सदर विभागाकडून मागील वर्षाचा कित्ता गिरवत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी अद्याप निश्चित तारीख दिली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.दहावी निकालानंतर आयटीआयमध्ये शिक्षण घेऊन करिअर घडविण्यासाठी सामान्य कुटुंबातील विद्यार्थी उत्सुक असतात. दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना आयटीआयमधून प्रवेश दिला जातो. गेल्यावर्षी प्रथमच आॅनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली; मात्र दहावीचा निकाल लागल्यानंतरही उशिराने सुरू झालेली प्रवेशप्रक्रिया पहिल्या दिवसापासूनच कोलमडली होती. यंदाही आॅनलाइन पद्धतीने प्रवेश राबविण्याचे जाहीर करण्यात आले असून, प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्यस्तरावरून तारखांमध्ये बदल होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. आयटीआयमध्ये ५ जुलै रोजी प्रवेशप्रक्रि या सुरू होणार होती. मात्र ५ जुलै रोजी संकेतस्थळाने मान टाकल्यामुळे विद्यार्थी सायबर कॅफेवर दिवसभर बसून होते. तथापि, संकेतस्थळाने मुखपृष्ठाचे दर्शन दिल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंद होण्याऐवजी हिरमोड झाला. कारण प्रवेशप्रक्रिया १० तारखेपासून सुरू होईल, असा संदेश झळकू लागला. शनिवारपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेवर गर्दी केली, मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दहावीनंतर आयटीआयमध्ये शिक्षण घेऊन खासगी नोकरी मिळविण्याकडे नव्या पिढीचा ओढा आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या सुरुवातीला आयटीआयमध्ये प्रवेशासाठी मोठी गर्दी होत असते. मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल १७ जूनला जाहीर झाला. त्यानंतर आठ दिवसांनी निकालपत्रही विद्यार्थ्यांच्या हाती मिळाले. इतरत्र प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असली तरीही आयटीआयमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी अद्याप थांबून आहेत. प्रवेश मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे इतर ठिकाणी प्रवेश बंद झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये वर्ष वाया जाण्याची भीती आहे. आॅनलाइन प्रवेशाची सविस्तर माहिती संस्थांची यादी व व्यवसायनिहाय अर्हता संकेतस्थळावर देण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रि या १० जुलैपासून सुरू होत असल्याचे व वेळापत्रकही त्याचदिवशी जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (वार्ताहर)