शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरी महाशिवरात्रीला दर्शनसेवा बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 01:33 IST

महाशिवरात्रीनिमित्त येत्या गुरुवारी (दि.११) त्र्यंबकेश्वरी होणारा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला  असून, त्र्यंबकराजाची दर्शनसेवाही बंद राहणार आहे. दि. १० ते १४ मार्च या कालावधीत त्र्यंबकेश्वर  शहर बंद  राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देयात्रा रद्द : अन्य दिवशी मात्र दर्शनाची मुभा

त्र्यंबकेश्वर :  महाशिवरात्रीनिमित्त येत्या गुरुवारी (दि.११) त्र्यंबकेश्वरी होणारा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला  असून, त्र्यंबकराजाची दर्शनसेवाही बंद राहणार आहे. दि. १० ते १४ मार्च या कालावधीत त्र्यंबकेश्वर  शहर बंद  राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.महाशिवरात्रीच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.५) सकाळी ११ वाजता प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनात  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गंगापुत्र, प्रशासनिक अधिकारी समीर वैद्य, उपस्थित होते. या चार दिवसांत गावात फक्त गजानन महाराज रस्ता खुला राहणार असून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत भाविकांना सोडण्यात येणार आहे. दरम्यान, रात्री उशिरा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक होऊन दि. ११ रोजी महाशिवरात्रीला दर्शनसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.मास्क बंधनकारक महाशिवरात्री वगळता अन्य दिवशी प्रवेशद्वारासमोर वैद्यकीय पथक सज्ज राहणार आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर  तसेच वैद्यकीय तपासणीनंतरच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. जबाबदारी मंदिर व्यवस्थापनाने घ्यावी, भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा न्यासाने करावी, अशा सूचनाही शुभम गुप्ता यांनी दिल्या. मंदिरावर लेझर शो  त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर भगवान शंकराचा लेझर शो दाखवण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. लेझर शो केवळ महाशिवरात्रीपुरता न ठेवता कायमस्वरूपी मंदिरावर असावा अशी मागणी त्र्यंबकवासियांनी केली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर