शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मृत कोरोनाबाधित महिलेवर मुस्लीम तरुणांनी केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 17:08 IST

सटाणा : तालुक्यातील जायखेडा येथील वयोवृद्ध हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मुस्लीम समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन हिंदू-मुस्लीम एकोप्याचे अनोखे दर्शन घडविले. आजच्या बिकट परिस्थितीत या महिलेच्या एकुलत्या मुलाच्या मदतीला धावून जात त्याला आधार तर दिला, शिवाय हिंदूधर्माच्या पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.

ठळक मुद्देजायखेड्यात हिंदू-मुस्लीम एकोप्याचे दर्शन

सटाणा : तालुक्यातील जायखेडा येथील वयोवृद्ध हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मुस्लीम समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन हिंदू-मुस्लीम एकोप्याचे अनोखे दर्शन घडविले. आजच्या बिकट परिस्थितीत या महिलेच्या एकुलत्या मुलाच्या मदतीला धावून जात त्याला आधार तर दिला, शिवाय हिंदूधर्माच्या पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.कोरोनाच्या दहशतीमुळे व खबरदारीमुळे अंत्यविधीला शेजारीपाजारी सोडाच जवळच्या नातेवाइकांनादेखील बंधने येत आहेत. माणुसकी, कर्तव्य या गोष्टींना तिलांजली देण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. अशा कटूप्रसंगी काही देवदूत मदतीला धावून जात असल्याने अंत्ययात्रा सुलभ करण्याचा एक प्रयत्न केला जात आहे. जायखेडा येथील ७२ वर्षीय महिलेचे शनिवारी निधन झाले. संचारबंदीमुळे आप्तस्वकियांना अंत्यविधीस येणे अशक्य होते. मात्र, स्थानिक नातेवाइकांनीही याकडे पाठ फिरविली. आईचा अंत्यविधी करण्याचा दुर्दैवी प्रसंग एकट्या मुलावर येऊन ठेपला. मात्र यावेळी मुस्लीम समाजातील मसूद पठाण, फिरोज पठाण, कमिल, अखलाख पठाण, मजहर पठाण, शेरखान पठाण, साखर शेख, मुजाहिद सय्यद, मोसिन शेख, मुसेर पठाण, अरबाज पठाण, सरफराज शहा, जायखेड्याचे पोलीस नाईक सुनील पाटील, राजेश साळवे व ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ शेवाळे यांनी पुढाकार घेत या महिलेवर अंतिम संस्कार केले. कोरोनामुळे माणसांचा मृत्यू होत असला तरी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे या तरुणांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक