शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव खोऱ्यात अंधाराचे साम्राज्य

By admin | Updated: June 16, 2014 01:04 IST

नायगाव खोऱ्यात अंधाराचे साम्राज्य

 

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून भारनियमनाच्या नावाखाली अतिरिक्त वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र त्यांना आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. वीज मंडळाच्या अतिरिक्त भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसाने विजेच्या खांबासह तुटलेल्या विद्युत वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगण्यात आले. त्यांची दुरुस्ती करण्यात आली; मात्र भारनियमनात काहीही सुधारणा झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरातील विहिरींना पाणी नसल्याने कृषिपंपाचा वीज वापर होत नसतानाही कमी वीज मागणीच्या काळातही अतिरिक्त भारनियमन सुरु केले आहे. वीज कंपनीने ठरवून दिलेल्या भारनियमनाच्या व्यतिरिक्तही वीजपुरवठा सतत खंडित केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून भारनियमनाव्यतिरिक्त थ्रीफेज वीजपुरवठा कधी दोन तास, तर कधी तासभर खंडित केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. खंडित होणाऱ्या थ्रीफेज वीजपुरवठ्याचा इतर गावांना फारसा फटका बसत नसला तरी गोदावरी नदीकाठच्या गावांना पिकांना पाणी देता येत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ज्या भागात थोड्या फार प्रमाणात विहिरींना पाणी आहे. त्या गावातील शेतकरी जनावरांना पिण्याचे पाणी काढण्यासाठीच वीजपंप सुरू करतात मात्र विस्कळीत होणाऱ्या वीजपुरवठ्याने शेतकऱ्यांना जनावरांसाठी पिण्याचे पाणी काढण्यासाठी हाल होत आहे. (वार्ताहर)