शहरं
Join us  
Trending Stories
1
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
2
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
3
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
4
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
6
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
7
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
8
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
9
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
10
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
11
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
12
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
13
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
14
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
15
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
16
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
17
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
18
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
19
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
20
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...

नगर-मनमाड राज्य महामार्गावर अंधाराचे साम्राज्य

By admin | Updated: February 20, 2017 23:13 IST

अंधाराचे जाळे कधी फिटणार : येवला पालिका हद्दीतील नागरिकांचा सवाल

येवला : शहरातून जाणाऱ्या नगर -मनमाड राज्य मार्ग क्रमांक १०च्या शहर हद्दीत दुभाजकावर टोल कंपनीने हायमास्ट (दिवे) केवळ शोभेच्या वस्तू बनल्या असून, गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने शहरातील हे अंधाराचे जाळे कधी फिटणार अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी गंगादरवाजा भागात जेवण करून अंधाराच्या वाटेने पायी शतपावली केल्याने पुन्हा एकदा महामार्गावरील हायमास्ट (दिवे) चर्चेत आले आहेत. संवेदना बोथट झाल्याने शोषिक येवलेकरदेखील सवय झाल्याप्रमाणे ब्र काढायला तयार नाहीत. बीओटी आणि नगरपालिका यांच्यातील तू तू मै मैमुळे येवला नगरपालिका हद्दीतून असणारे हे पथदीप अखेरची घटका मोजत आहेत. नागरिकांची काळजी करणारा कोणी शिल्लक आहे की नाही अशी विचारणा या रस्त्यावरून जाणारे येणारे करीत आहेत. या महामार्गावरून जाताना मुंबईतील मरीन ड्राईव्हचा आभास होतो अशा प्रकारची प्रशंसा येवला भेटीत दिग्गज पार्श्वगायक सुरेश वाडकर, सिनेअभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी करून गेले. मात्र सध्या रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. दुभाजकांची तात्पुरती डागडुजी गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. महामार्गावर बाभुळगाव शिवार ते येवला रेल्वेस्थानकापर्यंत असलेले दुभाजक अनेक ठिकाणी खराब झाले आहेत. या दुभाजकत १२४ विजेचे खांब आहेत. या खांबाचे दोन्ही बाजूला सोडियमचे दिवे लावलेले आहेत. हल्ली ते लागेनासे झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून दिवे बंदच असतात. तहसील कार्यालयापासून नांदेसर रेल्वे शेवटपर्यंत तर एकही दिवा आपला उजेड पाडत नाही. दिवे खराब झाले की त्याची देखभाल करण्यापोटी दिव्याला सीएफएलचे दिवे लावले जातात. मात्र हा दिवा केवळ शोभेची वस्तू झाले आहेत. विंचूर चौफुली ते आमदार छगन भुजबळ यांचे संपर्क कार्यालयपर्यंतच्या खांबावरील दिवेही अधून मधूनच हजेरी लावतात.  विंचुर चौफुली व फत्तेबुरुज नाक्यावरील चौफुलीच्या मध्यभागी हायमास्ट लावून त्यावर सर्व बाजूंना प्रकाश पडावा म्हणून पाच-सहा दिवे दिवसा दिसतात, तर रात्री बंद असतात. मनमाड-नगर मार्गावर प्रचंड वाहतूक असून, पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ राहात असल्याने सर्व दिवे लागणे आवश्यक आहे. या सर्व पथदीपांच्या देखभालीची जबाबदारी येवले शहाराजवळ असलेल्या टोल नाक्यावरील ठेकेदाराची की येवला पालिकेची हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. या संदर्भात काही कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन तक्रारी केल्या; पण त्याचा काही परिणाम झालाच नाही. आमदार छगन भुजबळ मतदारसंघात नित्यनियमाने यायचे तोपर्यंत दिवे प्रकाशित व्हायचे आता मात्र सध्या दिवे बंद राहात असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.  बीओटी तत्वावर झालेला हा रस्ता व त्या रस्त्यावर दिवे लावणेसह देखभाल दुरु स्तीचा खर्च बीओटी प्रशासनाने करायचा आहे.परंतु देखभालीसह वीजिबलाचा खर्च पालिकेने सोसून ही यंत्रणा पालिकेने ताब्यात घ्यावी अशा आशयाचे पत्र बीओटी प्रशासनाने पालिकेला पत्र दिले होते.पालिकेच्या सभेवर नेहमीप्रमाणे मार्गदर्शन मागवून दिव्याबाबत निर्णय घेऊ? अशी भूमिका पालिकेने घेवून हा विषय पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या प्रकरणी नेमका काय करार झाला आहे याची माहिती मागवून निर्णय घेणार असल्याचे ठरले होते. त्यामुळे अंधाराचे झाले फिटेल अशी अपेक्षा होती पण हे अंधाराचे जाळे फिटण्याची चिन्हे वर्षे उलटल्या नंतरिह दिसत नाही. यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागेल हे देखील अनुत्तरीत आहे. पालिकेवर वीजवितरण कंपनीची सुमारे 1 कोटी रु पयाची वीजिबल थकीत असल्याची माहिती आहे. सन २००७ पासून बीओटी ही राजमार्गावरील यंत्रणा चालवत होती. मतदार संघात मंत्री असताना हे दिवे प्रकाशित असायचे परतू सध्या शासनाच्या टोलबाबतच्या धोरणामुळे सध्या वीजिबल भरणे बीओटीला परवडत नसल्याची माहिती आहे.हा विजेचा बोजा नेमका कोणी सोसायचा या बाबतचा करार काय? नेमके कोणाच्या मनमानीत नागरिकांना वेठीस धरले जात आहे. याचा खुलासा करण्याची तसदी बीओटी अथवा नगरपरिषदेने घ्यावी.पालिकेत आता सत्तांतर झाले आहे. अच्छे दिनाच्या बोलबाल्यात हे दिवे प्रकाशमान व्हावे. या प्रश्नावर नविनर्वाचित लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून अंधाराचे जाळे फेडावे अशी हि अपेक्षा येवलेकरांची आहे.