शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: March 22, 2017 01:28 IST

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्त कर्मचारी प्रवास सवलतीच्या पासची मागणी करीत असून, अद्यापही हा प्रश्न सोडविण्यात आलेल्या नाही.

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्त कर्मचारी प्रवास सवलतीच्या पासची मागणी करीत असून, अद्यापही हा प्रश्न सोडविण्यात आलेल्या नाही. प्रलंबित विविध १४ प्रश्नांसाठी मंगळवारी एन. डी. पटेलरोड येथे एसटी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यात एकाच वेळी अशाच प्रकारे निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यासंदर्भात संघटनेने म्हटले आहे की, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत गेल्यावर्षी सरकारला नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर शासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णयही दिले. त्या निर्णयांचे परिपत्रक काढण्याचे आदेशही त्याचवेळी देण्यात आले होते.  कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतील व मुंबईमधील बीई एस.टी. या संस्थेने कोणत्या प्रकारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बस पास दिला जातो, याची माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असेदेखील आश्वासन शासनाने दिले होते. या आश्वासनांना आता सहा महिने होऊन गेले आहेत. मात्र अजून एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे संघटनेमध्ये तीव्र नाराजी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर एकाच वेळी धरणे आंदोलन करण्यात आले.  आंदोलनात विभागीय अध्यक्ष अशोक रांगणेकर, विश्वनाथ पुजारी, सुधाकर गुजराथी, राजाभाऊ जाधव, अनंत भालेराव आदिंसह जिल्हयातील निवृत्त एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)