चांदवड : शहरात डेंग्यूने थैमान घातले असून, मेहुल अनिल अग्रवाल (१५) या युवकाचे डेंग्यूने मुंबई हॉस्पिटलमध्ये निधन झाले. डेंग्यू आजाराचा अवघ्या १५ दिवसातील तिसरा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.चप्पल बुटाचे होलसेल व्यापारी अनिल रामुलाल अग्रवाल यांचा मुलगा मेहुल यास गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी ताप येत असल्याने चांदवड, पिंपळगाव, नाशिक येथे उपचार करून अधिक उपचारासाठी मुंबई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या मेंदूत ताप गेल्याने तो कोमातच होता. गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी श्रीरामरोडवरील शकील कच्छी यांचा इयत्ता सहावीतील मुलगा चि. कैफ याचे, तर सौ. पारसबाई जैन (दर्डा) यांचे डेंग्यूने निधन झाले तर मेहुल हा डेंग्यूचा तिसरा बळी आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी वरचे गावातील दोन बालिकांचा मृत्यू या डेंग्यूने झाला होता व चांदवड शहरातील काही रुग्ण पिंपळगाव, नाशिक येथे डेंग्यू आजाराने आजारी असल्याने औषधोपचार घेत आहे. मेहुलवर चांदवड येथे गुरुवारी (दि. २२) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (वार्ताहर)
चांदवड येथे डेंग्यूचा तिसरा बळी
By admin | Updated: September 22, 2016 00:14 IST