शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

डांगसौंदाणेत कांदा पाण्यात

By admin | Updated: July 12, 2016 23:03 IST

शेतकऱ्यांची दाणादाण : महसूल विभागाकडून परिसरात पंचनामे सुरू

डांगसौंदाणे : डांगसौंदाणेसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने बळीराजाचे लाखोंचे नुकसान झाले असून, महसूल विभागाकडून सदर नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती तलाठी सुरेश सोनवणे यांनी दिली.डांगसौंदाणेसह परिसरात काल झालेल्या पावसाने बळीराजाची दाणादाण उडवून दिली. १८ ते २० तास सलग कोसळलेल्या पावसाने परिसर जलमय होऊन नद्या, नाले, बांध तुडुंब भरून वाहत होते. या पावसाने शेतकरी बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यात किशोर चिंचोरे यांच्या कांदा चाळीत पाणी शिरून १५ ट्रॉली कांदा भिजून लाखोंचे नुकसान झाले. केदा पवार यांचा ५ ते ६ ट्रॉली कांदा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले. अनंत वाघ यांचाही ५ ते ६ ट्रॉली कांदा चाळीत भिजून मोठे नुकसान झाले, तर नीलकंठ चंद्रात्रे, बाबूराव वाघ, प्रभाकर जगताप, प्रकाश बिरारी यांच्या विहिरीत नाल्याचे पाणी शिरल्यामुळे विहिरी गाळ भरून बुजून गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पंढरीनाथ बोरसे यांच्या पोल्टी फार्ममध्ये पाणी शिरल्यामुळे ९ हजार पक्ष्यांपैकी ७ हजार पक्षी वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले, तर सुशील सोनवणे यांच्या पोल्टी फार्ममध्ये पाणी शिरल्यामुळे १००० ते १५०० पक्षी मृत पावले. (वार्ताहर)