शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

डांगसौंदाणेत बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:43 IST

डांगसौंदाणे : परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये घबरहाटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. वनविभागाने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आज या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देवनविभागाकडून पिंजरा नागरिकांमध्ये घबराट

डांगसौंदाणे : परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये घबरहाटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. वनविभागाने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आज या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.परिसरातील गुणतारा वस्तीलगत बाबूराव बुधा सोनवणे यांचे शेत असून, या शेतात असलेल्या उसाच्या पिकात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. गुणतारा वस्तीत आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. या आदिवासी बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर शेळीपालन केले असल्याने बिबट्याने भक्ष्याच्या शोधात या आदिवासी वस्तीलगत असलेल्या सोनवणे यांच्या उसात आश्रय घेतला असल्याचा अंदाज आहे.या आदिवासी वस्तीतील काही महिलानी या उसाच्या शेतात बिबट्या फिरत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी गुणतारा वस्तीतील इतरांना याबाबत माहिती दिली. भक्ष्याच्या शोधात बिबट्या या वस्तीजवळ आला असल्याने आदिवासी बांधवामध्ये घबरहाटीचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांनी आपले पशुधन वाचविण्यासाठी त्यांनी कालची रात्र जागून काढली.या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचा दुजोरा वनविभागाकडून देण्यात आला असून, पशुपालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याच्या मुक्त संचाराने येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाकडून येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सरपंच जिजाबाई पवार, उपसरपंच विजय सोनवणे, संजय सोनवणे, अंबादास सोनवणे दीपक सोनवणे, रवींद्र सोनवणे, महेश सोनवणे, संतोष परदेशी, जगदीश बोरसे आदींसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात आलीहोती.अधिकाºयांकडून घटनास्थळाची पाहणीसकाळी याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतर वनविभागाचेवनरक्षक नवनाथ मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून तसा वरिष्ठांना अहवाल पाठविला. स्थानिक नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केल्याचे वरिष्ठांना कळविले. याची तात्काळ दखल घेऊन बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी मंगळवारी पिंजरा लावण्यात आला आहे.