शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक विहीर बंदिस्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:47 IST

सुमारे सतरा वर्षांपासून शंभर फुटी रस्त्यावरील पिंगळे चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेली धोकादायक पडीक विहीर अद्यापही कायम असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनांची समोरासमोर धडक होऊन लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली. त्याची दखल घेत मनपा सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी पाठपुरावा करून अखेर विहीर बंदिस्त करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देसतरा वर्षांनंतर अडथळा होणार दूर : अपघात टळणार; लोकप्रतिनिधींनी केली पाहणी

इंदिरानगर : सुमारे सतरा वर्षांपासून शंभर फुटी रस्त्यावरील पिंगळे चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेली धोकादायक पडीक विहीर अद्यापही कायम असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनांची समोरासमोर धडक होऊन लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली. त्याची दखल घेत मनपा सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी पाठपुरावा करून अखेर विहीर बंदिस्त करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.मुंबई महामार्ग ते पुणे महामार्ग जवळचा मार्ग म्हणून राजीवनगर झोपडपट्टी, राजे छत्रपती चौक, कलानगर, वडाळागाव, डीजीपीनगरक्र मांक १ आदी मार्गे शंभर फुटी रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल, असे वाटत होते. परंतु राजीवनगर झोपडपट्टी एका खासगी भूखंडावर वसली असून, त्याठिकाणी झोपड्या बांधण्यास जागा नसल्याने नागरिकांनी सर्रासपणे शंभर फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस झोपड्या वसवल्या. तेव्हापासून पिंगळे चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेल्या या धोकादायक पडीक विहिरीमुळे वाहतुकीस अडथळा होऊ लागला आहे. त्यामुळे लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले. पाच वर्षांपूर्वी महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अडथळा ठरणाऱ्या शंभर फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या सुमारे ८० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या होत्या.परंतु अद्यापही पिंगळे चौकात असलेली धोकादायक पडीक विहीर तशीच आहे. त्यामुळे याठिकाणी वापरण्यासाठी केवळ ५० फूट जागा मिळत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. याची दखल घेत महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी पाठपुरावा केल्याने महापालिकेने धोकादायक पडीक विहीर ताब्यात घेऊन बंदिस्त करण्याचे ठरवले असून, सुमारे महिनाभरात रस्ता वाहतुकीस मोकळा होणार आहे. धोकादायक पडीक विहिरीची पाहणी आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी केली.एक महिन्यात वाहतुकीस रस्ता मोकळारस्त्याच्या मधोमध असलेल्या धोकादायक पडीक विहिरीस कठडे नसल्याने वाहने पडून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेने सदर धोकादायक पडीक विहीर ताब्यात घेऊन बंदिस्त करण्याचे ठरवले असून, सुमारे एक महिन्यात वाहतुकीस रस्ता मोकळा होणार आहे.सतरा वर्षांपासून शंभर फुटी रस्त्याच्या मधोमध असलेल्या धोकादायक पडीक विहिरीमुळे रस्ता पन्नास फुटी झाला होता. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. यातूनच लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले. नागरिकांच्या मागणीनुसार धोकादायक पडीक विहीर बंदिस्त करून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात येणार आहे. त्यामुळे शंभर फुटी रस्त्यावरून रहदारी करण्यास वाहनांना कोणताही अडथळा राहणार नाही.- सतीश सोनवणे,मनपा, सभागृह नेता

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका