शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

गोरक्षनगर परिसरात  धोकादायक विद्युततारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:25 IST

दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर येथील धोकादायक ओव्हरहेड विद्युततारा भूमिगत करण्यासाठीची निविदा लवकरात लवकर काढून विद्युततारा भूमिकेत कराव्यात, या मागणीसाठी गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे शुक्रवारी (दि.२७) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

पंचवटी : दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर येथील धोकादायक ओव्हरहेड विद्युततारा भूमिगत करण्यासाठीची निविदा लवकरात लवकर काढून विद्युततारा भूमिकेत कराव्यात, या मागणीसाठी गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे शुक्रवारी (दि.२७) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.गोरक्षनगरमधील बऱ्याच ओव्हरहेड विद्युततारा धोकादायक परिस्थितीत असल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी मंडळातर्फे सदर विद्युततारा भूमिगत करण्यासाठी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. सानप यांनी सदर काम तातडीने पूर्ण करण्यासाठीच्या सूचना संबंधित विभागाला देत कामासाठी निधीची तरतूद करून दिल्याने सदर कामाची निविदादेखील निघाली होती.  मात्र वीज कंपनीच्या कामांचे दर कमी असल्याने इलेक्ट्रिकल कामे करणाºया कंत्राटदारांच्या संघटनेने कामांच्या निविदाप्रक्रियेवर बहिष्कार टाकून कुठलीही निविदा न भरण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी कामाच्या निविदेला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.  सदर कामाची प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू करावे. यासाठी निवेदन देण्यात आले. कामाची आॅनलाइन फेरनिविदा आठ दिवसांत काढण्याचे आश्वासन वीज कंपनीमार्फत देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव, शिवाजी शिंदे, अपूर्व शास्त्री, विजय वाघमारे, संपतराव टोपे, हरिष कदम, सचिन साळुंके, दत्तात्रय राऊत, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीज