शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांच्या धास्तीने बनविला दर्जेदार आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:12 IST

देशमाने बुद्रुक येथील अंगणवाडीचा दरवाजा पडून दोन विद्यार्थी जखमी झाल्यानंतर हे प्रकरण जिल्हाभर गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे व महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी शनिवारी येवल्याला अचानक भेट देत ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.

येवला : देशमाने बुद्रुक येथील अंगणवाडीचा दरवाजा पडून दोन विद्यार्थी जखमी झाल्यानंतर हे प्रकरण जिल्हाभर गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे व महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी शनिवारी येवल्याला अचानक भेट देत ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.३० आॅगस्ट रोजी दुपारी अंगणवाडी सेविका आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवित असताना अचानक अंगणवाडीचा दरवाजा पडून वेदांत भालके व प्रणेती बागुल हे विद्यार्थी जखमी झाल्याने ग्रामस्थांनी देशमाने ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणाची दखल घेऊन दत्तात्रय मुंढे यांनी अंगणवाडीला भेट दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून देशमाने बुद्रुक येथील अंगणवाडी क्र मांक २ चा दरवाजा पडून दोनविद्यार्थी जखमी प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाची कानउघाडणी करत अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरत, बेजबाबदारपणाबद्दल खडसावले. देशमाने परिसराची पाहणी करून ग्रामपंचायतीच्या विविध निकष व नियमावलीच्या अधीन राहून ग्रामपंचायतीने काम करावे तसेच सरपंचांनी ग्रामपंचायतीची सर्व कार्यपद्धती समजून घेऊन व्यवस्थित अभ्यास करावा अन्यथा चुका झाल्यास कायदा सर्वांनाच लागू पडतो असेही मुंढे यांनी सांगितले. त्यानंतर आहार चौकशी, मुलांची पटसंख्या, विद्यार्थी प्रगती आदी बाबींची चौकशी करण्यात येऊन अंगणवाडी सेविकेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.