नाशिकरोड : जेलरोड दसक गावात बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ७० हजाराचा ऐवज चोरून नेला.दसक गावातील श्री महालक्ष्मी मंदिरामागे राहाणारे नरेंद्र रामदास आढाव हे सहकुटुंब गुरुवारी दुपारी शेगाव येथे दर्शनास गेले. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री आढाव यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ६० हजार रुपये किमतीचे मणिमंगळसूत्र, पॅन्डल, चांदीचे दागिने, सोन्याच्या पाच देवाच्या मूर्ती, एलसीडी टीव्ही असा ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. आढाव यांच्या घरासमोरच राहणाऱ्या त्यांच्या आई अनुसयाबाई यांना शुक्रवारी सकाळी मुलगा नरेंद्र यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. आढाव हे बाहेरगावी असल्याने चोरीचा अंदाज आलेला नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दसकला घरफोडी; ऐवज लंपास
By admin | Updated: November 20, 2015 23:43 IST