शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरमधील मोकाटांना दिला दंडुक्याचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:15 IST

बुधवारी दुपारी बारा वाजेनंतर कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट ...

बुधवारी दुपारी बारा वाजेनंतर कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला. मात्र, सायंकाळी पाच वाजेनंतर काही दुचाकीस्वार व चारचाकी वाहने रस्त्यावर दिसून येत होती. त्यामुळे महसूल, पोलीस, नगर परिषद, पंचायत समिती व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी बसस्थानकासमोर रस्त्यावर उतरून अ‍ॅक्शन मोडमध्ये आले.

उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी हातात दंडुका घेऊन दुचाकीवर फिरणाऱ्या नागरिकांना विचारपूस करण्यास प्रारंभ केला. तेव्हा दुचाकीस्वारांकडून विविध कारणे सांगितली जात होती. त्यांची कारणे ऐकून अधिकाऱ्यांना काठ्यांची भाषा समजून सांगण्याची वेळ आली.

नाशिक-पुणे महामार्गावर बसस्थानकाजवळ सायंकाळी पाच वाजता उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक चौधरी, अंकुश दराडे, भगवान शिंदे, समाधान बोऱ्हाडे, रवींद्र चिने, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक वर्षा लहाडे, नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांच्यासह महसूल, नगर परिषद, पोलीस व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरून कारवाई करीत असल्याचे चित्र सायंकाळी दिसून आले.

इन्फो...

१० हजार रुपयांचा दंड वसूल

बुधवारी दुपारी बारा वाजेनंतर कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही दुचाकी व चारचाकीस्वार या ना त्या कारणाने रस्त्यावर फिरत असल्याने प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले होते. पोलीस व महसूल दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुमारे १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

फोटो - १२ सिन्नर ४

सिन्नर बसस्थानकासमोर महामार्गावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारास काठीची भाषा समजावताना तहसीलदार राहुल कोताडे. समवेत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व पोलीस कर्मचारी.

===Photopath===

120521\12nsk_54_12052021_13.jpg

===Caption===

 सिन्नर बसस्थानकासमोर महामार्गावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारास काठीची भाषा समजावतांना तहसीलदार राहुल कोताडे. समवेत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व पोलीस कर्मचारी.