शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दांडीबहाद्दर ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:52 IST

दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर आणि वारंवार दांड्या मारणे तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना चांगलेच गरम पडले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी इजमाने येथील दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत, तर एका ग्रामविस्तार अधिकाºयाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याने पंचायत समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सटाणा : दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर आणि वारंवार दांड्या मारणे तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना चांगलेच गरम पडले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी इजमाने येथील दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत, तर एका ग्रामविस्तार अधिकाºयाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याने पंचायत समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  प्रत्येक गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा उबलब्ध होण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजातदेखील पारदर्शकता यावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार बागलाण तालुक्यातील बहुतांश गावचे आॅनलाइन कामकाज सुरू करण्यात आले आहे. तसेच हगणदारीमुक्त गाव करण्यासाठी शौचालयाची कामेदेखील प्रगतिपथावर आहेत. असे असताना इजमाने येथील बापू धुडकू अहिरे आणि विनायक पोपट सूर्यवंशी या दांडीबहाद्दर ग्रामसेवकांमुळे गावकºयांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच दप्तर दिरंगाईमुळे त्या गावातील शौचालयाची कामे न झाल्यामुळे हागणदारीमुक्त योजनेचा फज्जा उडाला आहे. आॅनलाइन दप्तर न केल्यामुळे कामकाजात पारदर्शकता दिसून येत नसल्यामुळे दोघा ग्रामसेवकांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवत निलंबनाचे आदेश दिले आहेत तर ग्रामविस्तार अधिकारी नितीन देशमुख यांच्यावरदेखील निलंबनाची टांगती तलवार आहे. त्यांनी स्वत:चा भ्रमणध्वनी बंद करून ठेवणे. ठेंगोडा येथील अतिक्रमण केल्याप्रकरणी चौकशीत कसूर केला म्हणून त्यांनादेखील कारणेदाखवा नोटीस बजावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.बागलाण तालुक्यात दांडीबहाद्दर ग्रामसेवक जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत. अशा निष्क्रिय ग्रामसेवकांमुळे गावाच्या विकासावर मोठा परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार दोन ग्रामसेवकांचे निलंबन करण्यात आले असून, ग्रामविस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनादेखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आगामी काळात शिक्षकांच्या बाबतीतदेखील हेच सूत्र राहणार असल्याचे बागलाणचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी सांगितले.