शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ग्रामिण भागात पांरपारिक खेळांची दांडी गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:13 IST

विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत कला, क्र ीडा, धार्मिक अध्यात्मिकते सोबतच ग्रामीण खेळांनाही मोठे महत्व दिले जात होते. मात्र दिवसेंदिवस खेळ बदललेले असून ग्रामीण व शहरी भागातील लहान मुलांची बोटेही संगणक व मोबाईलवर फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे अर्थात आधुनिकतेच्या काळात बालपणीच्या खेळाची धमाल आता हरवत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.

देवगांव : विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत कला, क्र ीडा, धार्मिक अध्यात्मिकते सोबतच ग्रामीण खेळांनाही मोठे महत्व दिले जात होते. मात्र दिवसेंदिवस खेळ बदललेले असून ग्रामीण व शहरी भागातील लहान मुलांची बोटेही संगणक व मोबाईलवर फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे अर्थात आधुनिकतेच्या काळात बालपणीच्या खेळाची धमाल आता हरवत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.  पूर्वी खेळल्या जाणार्या विट्टी दांडू ,कबड्डी, लंगडी, लपंडाव, आट्या पाट्या, सूर पारंब्या, चोर पोलीस, सागरगोट्या, लगोरी, कबड्डी, खो-खो, गलोल, असे अनेकविध खेळ आजच्या मोबाईल, संगणक, इंटरनेट, कार्टून , व्हीडीओ गेमच्या जमान्यात नामशेष होत आहे.  गावातील मैदानी खेळ , गल्लीतील धमाल , खेळाची मजा लुटणारे निरागस बालके दिसेनासे झाले आहे या उलट शाळेच्यावेळेशिवाय मुले संगणक किंवा टीव्ही कार्टून्स मध्ये रमताना दिसत आहे काही खेळ साधे, रंजन करणारे, तर काही स्पर्धात्मक , चढा-ओढीचे, जिंकण्याची इर्षा निर्माण करणारे. या प्रत्येक खेळाबरोबर महाराष्ट्राचा, मराठी माणसाच्या संस्कृतीचा एक धागा जोडलेला आहे.पारंपारिक मैदानी खेळामुळे मुलांची शारीरिक जडण घडण होऊन शरीर पिळदार बनत होते एक प्रकारे खेळांच्या माध्यमातून शरीरांची हालचाल होऊन मुलांचा चांगला व्यायाम व्हायचा त्यामुळे शरीरा बरोबरच बुद्धीलाही चांगली चालना मिळायची परंतु सदर खेळ हे या संगणक युगात कालबाह्य झाले असून आज घरा घरात संगणकाबरोबरच मोबाईल चा वापर होत असून बालकवर्ग आॅनलाईन ला ते प्राध्यान्य देत आहे शाळेचा वेळ वगळता जस ङ्क्त जसा वेळ मिळेल तसे मुले मोबाईल , संगणकाचा ताबा घेत आहेत. आजचे युग स्पर्धेचे आहे यात आपली बालके टिकली पाहिजे हा गवगवा जरी खरा असला तरी पालकांच्या अपेक्षेमुळे मुले शारीरिक,बौद्धिक, खेळांना हद्दपार करून एकाच ठिकाणी तासनतास बसून बालपण हिरावून घेत आहे. ‘‘बालपण देगा देवा.......’’ अश्या अभंगाच्या माध्यमातून संतासह कविंनीही बालपनाचे गोड कौतुक केले आहे मात्र आधुनुकतेच्या नावाखाली पारंपारिक खेळांची दांडी गुल होत आहे. मित्रत्वात सहकार्याची भावना वाढीस लागण्यासाठी तसेच शरीराला व्यायाम मिळण्यासाठी व मानिसक आनंदासाठी पारंपारिक खेळ महत्वाचे असतांना या खेळांना बगल दिली जात आहे. या मुळे बालकांच्या मानिसकतेबरोबरच आरोग्यावर परिणाम होत आहे.मैदानी खेळांच्या अभावी बालकांमध्ये नेत्रिवकार, मणक्याचे आजार, पाठ कंबरदुखी आदी आजार बळावत आहे हे मात्र नक्की.‘‘पुरातन काळापासून आपण अनेक खेळ परंपरा जोपासत आलो आहोत. परंतू आधुनिकतेकडे वळतांना जुने खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याला जबाबदार आपणच आहोत. मुले मोबाईलवर गेम खेळतांना किंवा टि ?ही वर कार्टून पाहतांना आपण बघतो पण त्याकडे लाडामुळे दुर्लक्ष करतो. त्याला म्हणतो की, तुझ मोबाईल वर गेम खेळून झाल्यावर किंवा कार्टुन पाहील्यानंतर अभ्यास कर. यामुळे पालकच त्यांना प्रोत्साहन देतात असे वाटते. कधी - कधी तर मित्रपरिवारात मोठया अभिमानाने सांगतात, माझा मुलगा मोबाईलच्या बाबतीत फार हुशार आहे. यामुळे नकळत आपलेच दुर्लक्ष होतय हे मात्र नक्की. याउलट गल्लीतील पाच -सहा मुलांना एकत्र करून व स्वत: अर्धा तास का होईना त्यांच्या कडून दररोज एखादा खेळ उदा . लंगडी,आटया- पाटया, लंपडाव इ. असे खेळ शिकवले पाहिजेत. जेणेकरून पालकही टि ?ही कमी पाहतील व सर्वच मुलांवर लक्षही राहील. व यातून एक जिव्हाळा निर्माण होईल.- संदिप हिरे, जि.प.शिक्षक देवगावं.

टॅग्स :Sportsक्रीडा