शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहर सुधार समिती बैठकीला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:14 IST

शहर सुधार समितीवर प्रशासनाकडून काहीच प्रस्ताव येणार नसतील तर नुसती चर्चा करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल उपस्थित करत सदस्यांनी समितीच्या अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नाशिक : शहर सुधार समितीवर प्रशासनाकडून काहीच प्रस्ताव येणार नसतील तर नुसती चर्चा करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल उपस्थित करत सदस्यांनी समितीच्या अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समितीच्या पहिल्याच सभेला खातेप्रमुखांनी दांडी मारल्याने दुय्यम फळीतील अधिकाºयांनी केवळ माना डोलावण्यापलीकडे काहीही भूमिका निभावली नाही. त्यामुळे कोणताही निर्णय न होता नुसत्या चर्चेवरच सभा आटोपती घ्यावी लागली.महापालिकेच्या शहर सुधार समितीची पहिलीच बैठक सभापती भगवान दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. समितीच्या विषयपत्रिकेवर फूटपाथची सुधारणा आणि पार्किंगचे नियोजन हे दोन विषय उपसभापती स्वाती भामरे यांनी मांडलेले होते. सभेच्या प्रारंभीच सदस्यांनी प्रशासनाचे प्रस्ताव कुठे आहेत, असा सवाल उपस्थित केला. शहर सुधार समितीशी बांधकाम, उद्यान, नगररचना, अतिक्रमण या विभागांचा संबंध येत असल्याने संबंधित विभागांचे खातेप्रमुख कुठे आहेत, असा जाबही सदस्यांनी नगरसचिवांना विचारला. त्यावेळी नगरसचिवांनी संबंधिताना सभेचे पत्र दिले असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सदस्यांनी पुढच्या सभेला खातेप्रमुखांची उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगितले. सभेत सुवर्णा मटाले यांनी शहरातील मनपाच्या मोकळ्या भूखंडांवर वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करतानाच यशवंत मंडईच्या जागेवर लवकरात लवकर बहुमजली वाहनतळ साकारण्याची मागणी केली. रुची कुंभारकर यांनीही डीपीरोडलगत फूटपाथ तयार करण्याची सूचना केली तसेच आवश्यक त्या ठिकाणी दुभाजक टाकण्याचीही मागणी केली. सत्यभामा गाडेकर यांनी समितीच्या अधिकारकक्षाबाबत प्रश्न उपस्थित केला. साईड पट्ट्या, आरक्षित भूखंडांचा विकास, दिशादर्शक फलक, नदीकिनारी पर्यटन स्थळाची निर्मिती आदी सूचनाही त्यांनी केल्या. पंडित आवारे यांनी जुन्या धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याठिकाणी पार्किंगचे नियोजन करण्याची सूचना केली. स्वाती भामरे यांनी गरज असेल तेथेच पेव्हर ब्लॉक बसविण्याची सूचना केली. तुटलेल्या दुभाजकांच्या दुरुस्तीचेही आदेश दिले. सभेला अधिकारी उपस्थित होते.