शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित आकृतिबंधासाठी कृषी सहायक संघटनेचे धरणे

By admin | Updated: June 20, 2017 01:46 IST

ठिय्या : १० जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने सोमवारी (दि.१९) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोेलन केले. मागण्या मान्य न झाल्यास १० जुलैपासून कृषी सहायक बेमुदत काम बंद आंदोेलन करणार आहेत.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय ३१ मे २०१७ रोजी निर्गमित केला आहे. परंतु अद्याप कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध काय असेल, याबाबत कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ज्यामुळे कृषी विभागात भविष्य काय? असा प्रश्न प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडला आहे. सोमवारी झालेल्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष शरद थेटे, कार्याध्यक्ष अरविंद आढाव, राजेंद्र काळे, राजेंद्र सावंत, भास्कर बिन्नर, रूपाली लोखंडे, छाया थोरात, दिगंबर पगार, सुनील सोनवणे, जयकीर्तीमान पाटील, सुनीता कडनोर, शबाना अतार, मनीषा पवार आदी सहभागी झाले होते.