शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

जिल्हा परिषद शाळेचे टवाळखोरांकडून नुकसान

By admin | Updated: July 30, 2016 21:33 IST

पिळकोस : पालक, शिक्षक, ग्रामस्थांकडून संताप

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या व नवीन स्वच्छतालयाचे, स्वच्छतागृहाचे व शाळेच्या आवाराचे गावातील काही टवाळखोरांकडून सतत नुकसान केले जात असून, शाळा सुटल्यावर गावातील टवाळखोर हे नाहक शाळेच्या आवारात येऊन नुकसान करत असल्याने याबाबत पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.या प्रकारामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादाजी जाधव व सरपंच साहेबराव रेवबा जाधव हे अज्ञात टवाळखोरांविरोधात पोलिसांत तक्र ार करणार असून, शाळा सुटल्यावर किंवा सुटीच्या काळात शाळेच्या आवारात आढळणाऱ्या संशयितांवर गावातील सामाजिक कार्यकर्ते नजर ठेवून असणार असून, शाळेच्या आवारात कुणीही संशयास्पद आढळून आल्यास त्यावर यापुढे कठोर कारवाई करण्याचा निर्णय गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आता घेतला आहे. पिळकोस जिल्हा परिषद शाळा ही गावाच्या बाजूला स्मशानभूमी रस्त्याला असून, गावाच्या शेवटच्या कोपऱ्याला असलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेचे तीन वर्षांपासून काही टवाळखोर तरुणांकडून नाहक नुकसान केले जात आहे. या त्रासामुळे शाळेला चहुबाजूनी संरक्षक भिंतही जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीकडून बांधण्यात आली असून, गेटही बसविण्यात आले आहे. या भिंतीला काही ठिकाणी कोणी भिंतीवरून आत येऊ नये यासाठी काचाही लावण्यात आल्या आहेत. परंतु या टवाळखोरांनी या काचा काढून टाकल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी असलेल्या टाकीचे सर्व नळ तोडण्यात आले आहेत. टाकीही फोडण्यात आली आहे. तसेच शाळेचे गेटही काढून टाकले आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतालयाचे व स्वच्छतागृहाचे पत्रे फोडले असून, नवीन स्वच्छतालयाचे व स्वच्छतागृहाचे पाइपही फोडले आहेत व दरवाजा तोडण्यात आला आहे. या जुन्या स्वच्छतालयाचे व स्वच्छतागृहाचे पूर्णत: नुकसान केले गेले आहे. गावातील काही टवाळखोर शाळा सुटल्यावर शाळेच्या आवारात प्रवेश करतात, क्रि केट खेळतात तसेच शाळेच्या बाजूला असलेल्या आदिवासी वस्तीतील काही जण या शाळेच्या आवारात नुकसान करतात. त्यामुळे शाळेचे सौंदर्य खराब होऊन याचा त्रास शिक्षक व विद्यार्थ्यांना होत आहे. गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन या प्रकाराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार आहेत. शाळेच्या आवारात नाहक आढळून येणाऱ्या दोन-चार टवाळखोरांना पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हाच आता शेवटचा मार्ग अवलंबिण्याचे राहिले आहे, असे गावकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तीन वर्षांपूर्वी किचन शेडचा दरवाजा अशाच प्रकारे तोडण्यात आला होता. तसेच शाळेच्या आवारातील रंगरंगोटी व वऱ्हांड्यातील स्वातंत्र्यसैनिकांची रंगवलेली चित्रे विदू्रप केली होती व शाळेच्या भिंतींवरही विद्रूप लिहून ठेवले होते. शाळेला साप्ताहिक सुटी असो वा उन्हाळ्याची सुटी वा दिवाळीची सुटी, त्यावेळेस या शाळेच्या आवारात येणारे टवाळखोर क्रि केट खेळण्यासाठी येऊन नुकसान करतात व त्या काळात शाळेचे नुकसान हे मोठ्या प्रमाणात होते. शाळेचे तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान सुरू असून, नुकसान करणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून व गावकऱ्यांकडून जोर धरत असून, टवाळखोरांच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)