शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने शेतक-यांच्या पॉलिहाऊसचे नुकसान

By admin | Updated: June 2, 2017 18:26 IST

इगतपुरी तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेणीत येथील शेतकऱ्यांचे शेडनेटचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. 2 - इगतपुरी तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेणीत येथील शेतकऱ्यांचे शेडनेटचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  
 
घोटी सिन्नर महामार्गावरील शेतकरी रतन जाधव, पंडित जाधव,  लता जाधव यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेडनेटद्वारे शिमला मिरची, पॉलिहाऊसच यशस्वी प्रयोग केला होता.
 
मात्र अवकाळी वादळ वाऱ्याने त्यांचा घास हिरावून घेतल्याने ते हतबल झाले आहे. परिसरात कोणत्याही प्रकारचा रोजगार नसल्याने शेतकऱ्यांनी  यांनी पारंपरिक शेती करत राष्ट्रीयकृत बँकेतून कर्जपुरवठा करून शेडनेट या आधुनिक शेतीचा नुकताच प्रयोग केला मात्र निसर्गाच्या अवकृपेने काही क्षणात नष्ट झाले. 
 
वादळ व वाऱ्याने शेडनेटचे 8 ते 9 लाखाचे नुकसान झाल्याने त्यांच्या डोळ्यातील अश्रू मावेनासे झाले आहेत. चार ते पाच एकरवरील फळावर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  
 
शेडनेटमधील शिमला मिरचीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी (1 जून) मेघगर्जनेसह वादळ व गारपिटीने शेडनेट पूर्णपणे उद्धवस्त झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तात्काळ दखल घेऊन आता मदत कधी मिळते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.  
 
झालेल्या नुकसानाचे  शासनस्तरावर पंचनामा करावा, अशी मागणी  शेतकऱ्यांनी केली.
""क्षणात हिरावून घेतले सारं""
नुकतेच राष्ट्रीयकृत बँकेमधून कर्जपुरवठा घेऊन शेडनेटची शेती व पॉलिहाऊसची उभारणी केली होती. मात्र वादळ वाऱ्याने अवकाळीने सर्व काही क्षणभरात हिरावून घेतले आता जगावे तरी कसे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन  मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. -रतन पाटील जाधव, शेतकरी शेणीत