शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

देवळा तालुक्याच्या पुर्व भागात अतीपावसाने शेतीपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:44 IST

उमराणे : गेल्या पंधरवाड्यापासुन देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरातील गावात अतीपावसाने मका, बाजरी, कांदे आदी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहणी प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजवळ यांनी दिले असुन शासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देआर्थिक फटका : तहसिलदारांनी दिले पंचनामे करण्याचे आदेश

उमराणे : गेल्या पंधरवाड्यापासुन देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरातील गावात अतीपावसाने मका, बाजरी, कांदे आदी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहणी प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजवळ यांनी दिले असुन शासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंधरवाड्यापासुन तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरातील सांगावी,कुंभार्डे, चिंचवे, गिरणारे, तिसगाव, वर्हाळे, खारीपाडा आदी गावांमध्ये अतीपावसाने मका, बाजारी, तुर, लाल पावसाळी कांद्याचे रोपे, लाल कांदे आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पुर्णत: वाया जाऊ लागल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी होताच आमदार राहुल अहेर यांच्यासह देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजवळ, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, तलाठी एस.एस.पवार, माजी जि.प.सदस्य प्रशांत देवरे, शेतकी संघाचे संचालक संदिप देवरे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भरत देवरे आदींनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसान पाहणी दौरा केला. तसेच शेतकर्यांच्या व्यथा जाणुन घेतल्या. यावेळी राहुल अहेर यांनी नुकसानीबाबत शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असुन तहसीलदार दत्तात्रय शेजवळ यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतपिकांचे लवकरच पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतीपावसाने चार एकर मका शेतात पाणी साचल्याने शेत उपळले आहे.परिणामी संपुर्ण मका पिक वाया गेल्याने संकट ओढावले आहे. शासनाने पंचनामे करुन तात्काळ नुकसानभरपाई मिळवुन द्यावी. -बाळासाहेब देवरे, नुकसानग्रस्त शेतकरी 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी