शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धरणात मुबलक पाणी, तरीही नळजोडण्यांबाबत निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:35 IST

शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले असताना शहरात मात्र इमारतीत राहणाºया मिळकतधारकांना नळजोडणी दिली जात नाही. कोणत्याही सोसायटीधारकास केवळ तळमजल्यावरच नळजोडणी देण्याच्या एका तुघलकी निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले असताना शहरात मात्र इमारतीत राहणाºया मिळकतधारकांना नळजोडणी दिली जात नाही. कोणत्याही सोसायटीधारकास केवळ तळमजल्यावरच नळजोडणी देण्याच्या एका तुघलकी निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. त्यामुळे महापालिकेने सोसायटीधारकांना ते मागतील त्या मजल्यापर्यंत नळजोडणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा नळजोडणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.नाशिक शहरात यापूर्वी कोणत्याही इमारतीत पहिल्या किंवा दुसºया मजल्यावर यापूर्वी नळजोडणी देण्यात आली आहे. मात्र अशा नळजोडणीला पुरेसे पाणी न मिळाल्यास नागरिक तक्रार करतात, या एका कारणाने एका अधिकाºयाने सोसायट्यांना नळजोडण्या देण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सोसायटीतील अनेक सभासदांना आवश्यकता असूनही जोडणी मिळत नाही. त्यामुळे वयोवृद्ध आणि अन्य नागरिकांचे हाल होत आहेत. धरणात पुरेसा साठा असल्याने आता तरी जोडण्या देण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष गणेश कांबळे यांनी केली आहे. याशिवाय महापालिकेने जलवाहिनी दुरुस्तीची कामे नळजोडण्यांसाठी निविदा काढून मोठ्या मक्तेदार कंपन्यांना न देता महापालिकेने प्राधिकृत केलेल्या नळजोडणी कारागिरांना द्यावीत, मनपाचे काही कर्मचारी विशेषत: व्हॉल्व्हमन किंवा मिस्तरी हेच परस्पर नळजोडण्या देतात, त्यांची चौकशी करावी नळजोडणीच्या अर्ज मंजुरीचे अधिकार उपआयुक्त किंवा अधीक्षक अभियंता यांना द्यावेत, अशा मागण्या कांबळे तसेच दे. सं. देशमुख, गंगाधर शेरे, सुरेश गोसावी, रोहिदास सुरंजे यांनी केली आहे.