रोहित रामजी चव्हाण यांनी त्यांची ॲक्टिवा दुचाकी (एमएच १५ एचडी ३५८३) सावरकरनगर येथे उभी केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.
दुसऱ्या घटनेत घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली मोटारसायकल चोरी गेल्याप्रकरणी सुुजीत मनोहर ढोबळे (रा. शिवाजीनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्याने वाहनतळातून त्यांची दुचाकी (एमएच १५ डीडब्ल्यू ८९१७) गायब केली.
सुमित श्रीगोपीचंद्र जयस्वाल (रा. दत्तनगर, चुंचाळे) यांची दुचाकी (एचएच १५ जीयू ६१०२) घराजवळ उभी केली होती. या वेळी त्यांची ही ७५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुस्तुम कान्होजी मोरे (रा. भुजबळ फार्मजवळ) यांची दुचाकी (एचएच १५ डीएन ०९५४) गौळाणे फाटा येथे त्यांनी उभी केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.