नाशिक : दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची व वैयक्तिक लाभार्थ्यांनी घेतलेल्या योजनांमधील लाभांची तपासणी करण्याचा निर्णय समाजकल्याण समितीने घेतला असल्याची माहिती समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी दिली. सभापती उषा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजकल्याण समितीची मासिक बैठक झाली. बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. या बैठकीला कळवण, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, देवळा, निफाड, चांदवड व मालेगाव तालुका विस्तार अधिकारी वगळता सात विस्तार अधिकारी अनुपस्थित होते. या विस्तार अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश उषा बच्छाव यांनी समाजकल्याण अधिकारी सतीश वळवी यांना दिले. २० टक्के सेस व अपंगांच्या ३ टक्के योजनांमध्ये काही योजना नव्याने समाविष्ट करण्यात आल्या असून, त्यात मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थिंनींना सायकल पुरविणे, अपंग युवक व युवतींना झेरॉक्स मशीन पुरविणे, महिलांना पापड व शेवया मशीन तसेच घरघंटी (पीठाची गिरणीचे मशीन) पुरविणे या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
दलितवस्तीची कामे व वैयक्तिक लाभार्थ्यांची होणार
By admin | Updated: November 18, 2014 00:39 IST