शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

द्वारकाचा ‘चक्रव्यूह’ बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:34 IST

नाशिक : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि दोन महामार्गांना छेदणाऱ्या चौफुली म्हणजे द्वारका असली तरी मुळातच याठिकाणी अनेक मार्ग एकत्र येत असल्याने त्याला चौक म्हणणेही कठीण आहे. सात ते आठ ठिकाणचे रस्ते एकाच ठिकाणी येत असल्याने सर्व भार या एकाच ठिकाणी असतो. द्वारकावरील वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदणे दिव्यच मानले जाते. अनेक पर्याय आखले गेले आणि अमलातही आले परंतु उपयोग झालेला नाही. उड्डाणपूल झाल्यानंतर याठिकाणी भुयारी पादचारी पूलही बांधण्यात आला परंतु वर्षांनुवर्षे असलेली ही जटील समस्या मात्र अद्याप सुटलेली नाही.

ठळक मुद्दे समस्या : उड्डाणपुलाने आणखीनच वाढली कोंडी

नाशिक : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि दोन महामार्गांना छेदणाऱ्या चौफुली म्हणजे द्वारका असली तरी मुळातच याठिकाणी अनेक मार्ग एकत्र येत असल्याने त्याला चौक म्हणणेही कठीण आहे. सात ते आठ ठिकाणचे रस्ते एकाच ठिकाणी येत असल्याने सर्व भार या एकाच ठिकाणी असतो. द्वारकावरील वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदणे दिव्यच मानले जाते. अनेक पर्याय आखले गेले आणि अमलातही आले परंतु उपयोग झालेला नाही. उड्डाणपूल झाल्यानंतर याठिकाणी भुयारी पादचारी पूलही बांधण्यात आला परंतु वर्षांनुवर्षे असलेली ही जटील समस्या मात्र अद्याप सुटलेली नाही.मुंबई-आग्रा महामार्ग आणि नाशिक-पुणे मार्गावर असलेल्या या चौफुलीला सर्व्हिसरोड बरोबर अमरधामकडून येणारा रस्ता तसेच अन्य अनेक उपमार्ग आहेत. व्यापारी संकुले, हॉटेल्स तसेच परिसरात शाळादेखील आहेत. त्यात अतिक्रमणांची भरदेखील आहे. शहरातून नाशिकरोडकडे जाणारी आणि नाशिकरोडकडून शहराकडे येणाºया वाहनांची संख्या प्रचंड आहे. शिवाय त्यात अवजड वाहनेदेखील असतात. द्वारका चौफुलीवर कुठूनही कुठे जायचे असेल तर वाहतुकीच्या जंजाळातून बाहेर पडणे एक अग्निदिव्यच असते. वाहतूक पोलीस नसतील तर या चौकातून प्रवास करणेच जणू अशक्य ठरले आहे. वाहतूक पोलिसांनी एका बाजूची वाहतूक रोखून धरली नाही तरी वाहने सुटतात आणि वाहतुकीचा गुंता होत असतो.सदरच्या चौकाची समस्या वर्षांनुवर्षाची आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी मुंबई-आग्रा मार्गावरील उड्डाणपूल कामी येईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला. याच चौकात पंचवटी येथून उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक उतरण्यासाठी आणि पुन्हा उड्डाणपुलावर चढण्यासाठी येथेच गर्दी होते. याशिवाय कसारा तसेच आडगावसह अन्य ग्रामीण भागात जाणाºया अनेक प्रवासी वाहतुकीचे थांबे याच ठिकाणी आहेत. खासगी प्रवासी बसचे थांबे येथे आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी