शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर  परिसरात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:36 IST

परिसरात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, महापालिकेचा आरोग्य विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

इंदिरानगर : परिसरात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, महापालिकेचा आरोग्य विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  परिसरात डेंग्यूसदृश आजाराने डोके पुन्हा वर काढले आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, डेंग्यूसदृश रुग्णांच्या शरीरातील पांढºया पेशी आणि प्लेटलेट कमी होत असल्याने तातडीने रुग्णालयात संबंधित रुग्णाला दाखल करावे लागत आहे. औषधोपचारासाठी आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  जेव्हा मलेरिया विभागाला समजते की, या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आहेत तेव्हाच धूरफवारणी केली जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  गेल्या काही दिवसांपासून शहरात डेग्यूचे वाढते रुग्ण व डासांचा वाढता प्रादुर्भाव तसेच ठिकठिकाणी साचलेले कचºयाचे ढीग यावर उपाययोजनेसाठी महापौरांनी तातडीने बैठक बोलावली होती. परंतु त्यानंतरही इंदिरानगर परिसरात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने चिंता व्यक्त होत आहे. धूर फवारणीची मागणी धूर फवारणी चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने केली जात असल्याने ती फक्त रोड शो ठरत आहे. छोट्या मशीनद्वारे धूर फवारणी करण्याची मागणी पूर्व प्रभाग सभेत नगरसेवकांनी करूनसुद्धा मनपा प्रशासन ढिम्म आहे. धूर फवारणी नियमित केव्हा होणार, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdengueडेंग्यू