शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीचा जल्लोष : बसस्थानकात गोपिकांनी फोडली दहीहंडी;

By admin | Updated: August 20, 2014 00:41 IST

शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेलागोविंद बोलो, हरि गोपाल बोलो...

सिन्नर : शहर व तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली, तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याला गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहात दहीहंड्या फोडून जल्लोष केला. ‘गोविंद बोलो, हरि गोपाल बोलो..’, ‘गोविंदा आला रे...’च्या गजराने परिसर दणाणून गेला होता.तालुक्यातील विविध शाळांमध्ये सुट्यांमुळे आदल्या दिवशी, तर काही शाळांत दुसऱ्या दिवशी बाल गोविंदांनी दहीहंडीचा आनंद लुटला. राज्य परिवहन आगारातील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पाथरे येथील महानुभाव आश्रमाचे दामोदर बाबा महानुभाव यांनी कृष्णलीला व श्रीकृष्णाची महती सांगितली. यावेळी आगार व्यवस्थापक दिलीप जाधव, सौ. मीराबाई गोसावी, मीराताई दराडे, मनेगावच्या सरपंच सुनंदा सोनवणे, कलावती सांगळे आदि उपस्थित होते. दत्ता गोसावी यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले. येथील एस. टी. आगाराच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी सिन्नर येथून जाळीचा देव, नारायणपूर, पंढरपूर, जेजुरी, रिद्धपूर, सप्तशृंगगड, अष्टविनायक दर्शन तसेच राज्याच्या बाहेर मथुरा, द्वारका, वृंदावन दर्शन येथे खास बस सेवा सुरू करण्यात आली असून, साडेतीन शक्तिपीठ असलेल्या माहूरची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी या साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगारव्यवस्थापक दिलीप जाधव यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी संघटनेचे प्रमोद घोलप यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी योगेश खाडे, विजय उगले, गणेश उगले, संपत पगार, अनिल कटारनवरे, एस. एस. शिंदे, बी. आर. आव्हाड, पी. एस. बिन्नर, विजय ओतारी, सुधाकर जाधव, जी. टी. सानप, डी. बी. खाटेकर आदिंसह आगारातील कर्मचारी, नागरिक, भाविक उपस्थित होते. पाडळीयेथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या गोविंदा पथकाने ‘गोविंदा आला रे आला’च्या गजरात तीन थर रचून दहीहंडी फोडली. झांज पथक, लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.विद्यार्थ्यिनींनी म्हटलेल्या ‘गोविंदा आला रे...’ या गाण्याच्या सुरात विद्यालयातील सात विद्यार्थ्यांनी तीन थराचा मानवी मनोरा करून अजय रेवगडे याने दहीहंडी फोडली. याप्रसंगी प्रा. टी. एस. ढोली, सरपंच अशोक रेवगडे, बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, श्रीमती एम. एम. शेख, सौ. सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. व्ही. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली आदिंसह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. (वार्ताहर)